लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीत अधिकाऱ्यांनी पुन्हा जुनेच अहवाल ठेवले. मात्र बैठक संपल्यानंतर ही बाब सदस्यांच्या लक्षात आली. तोपर्यंत बैठक मात्र खेळीमेळीत आटोपलेली होती.जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.या बैठकीत वारंवार तीच माहिती दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषत: लघुसिंचन विभागाकडून मार्चपासूनच्या बैठकीत तोच अहवाल ठेवला जात असल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. त्यात अनेक कामे प्रगतीत असल्याचे दाखविले जाते. तर ती पूर्ण होण्याचा पत्ता नाही. जलयुक्तच्या कामांचीही प्रगती नाही. संपूर्ण स्वच्छता विभागाने आता १४६ गावे हागणदारीमुक्त झाल्याचे सांगितले असून यंदाच्या उद्दिष्टाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर पाणीपुरवठा विभागानेही मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतील १७ गावांचा आराखडा दिला. तर २0१७-१८ च्या आराखड्यात १३ पैकी केवळ २ कामेच मंजूर झाली व ही कामे सुरू झाल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे लघुसिंचनच्या कामांचा मार्च एण्डचाच अहवाल सादर केला. त्यात अनेक कामे सुरूच नाहीत. तर खर्चही 0 टक्के आहे. गोषवाऱ्यात शिल्लक रक्कम ८ कोटींवर आहे.
जलव्यवस्थापनमध्ये तेच ते अहवाल
By admin | Published: June 21, 2017 11:28 PM