लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे २३ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत यासह विविध मागण्यांसंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांना निवेदन देण्यात आले.जिल्हा परिषद विभागाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण होऊन पात्र आहेत. पात्र असलेल्या शिक्षकांना पूर्वीच्या जुन्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याची मागणी केली. तसेच उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या कराव्यात. विषय शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात. भविष्य निर्वाह निधी तपशील मार्च २०१७ पर्यंत द्यावा आदी मागण्या केल्या. निवेदनावर अध्यक्ष रामदास कावरखे, भानुदास शिंदे, मनोहर मगर, किसन डांगे, दिगंबर शेळके यांच्यासह शिक्षक संघ पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.
शिक्षक संघातर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:15 PM
महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे २३ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत यासह विविध मागण्यांसंदर्भात जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देहिंगोली : वरिष्ठ वेतनश्रेणीची मागणी