संशोधन हे फक्त पदवी मिळवण्यापर्यंतच मर्यादित न राहता ते व्यापक आणि समाजासाठी दिशादर्शक असले पाहिजे. या चर्चासत्रात हिमाचल प्रदेशचे डॉ. जगमित बावा, प्रो. धनश्री महाजन, बिहारचे डॉ. गोपाल जी. सिंग, डॉ. वेंकटेश लांब यांनी मार्गदर्शन केले. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रो. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर.टी. बेंद्रे उपस्थित होते. या वेळी प्राचार्य शिवानंद कांबळे, प्राचार्य शरद गावंडे, प्राचार्य एस.आर. टकले, प्रा. विजय पांडे, डॉ. सुवर्णा पाटील, दिनेश कचकुरे, विविध विद्यापीठांतील व महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजेश करपे, सूत्रसंचालन डॉ. मनीषा काळे यांनी तर प्राचार्य डॉ. शरद गावंडे यांनी आभार मानले.
सामाजिक शास्त्रांचे संशोधन हे समाजोपयोगी ठरावे - कुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:04 AM