औरंगाबाद : संशोधन केंद्रावर आधी सोयी, सुविधा द्या. तोपर्यंत पीएचडी संशोधकांना अनिवार्य केलेल्या बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयाला स्थगिती द्या. अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरूंकडे केली. तर विद्यापीठाच्या विभागात आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देवू. मात्र, निर्णयाला स्थगिती मिळणार नसल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ठ केल्याने संशोधक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
क्षेत्रभेटीवर आधारीत संशोधकांना क्षेत्रभेटीसाठी किती सुट्या मिळतील. हे अस्पष्ठ असून बायोमॅट्रीकमुळे संशोधकांच्या परीणामकारकरता आणि कार्यक्षमतेवर परीणाम होईल. विभागांच्या पायाभूत सुविधांचे आधी ऑडिट करा. आवश्यक सुविधा द्या. त्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करा. विद्यार्थीनी, विविहित महिला, मातांसाठी केंद्रावर येवून संशोधन मानसिक व शाररिक ताण वाढवणारे आहे. द्वीतीयक अभ्यासस्त्रोतावर आधारीत संशोधन असणाऱ्यांना संदर्भ गोळा करणे, कच्चे काम, टायपिंग, शोधपत्र लिहीने सोयीसुविधांअभावी गैरसोयीचे आहे. विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयात संदर्भ विभागात संशोधकांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. संदर्भ ग्रंथालय अपडेट नाही. संगणक प्रयोगशाळा तसचे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी क्युबिकल लॅब नाही. इ बुक्स अद्ययावत केलेले नाही. वसतीगृहाची सुविधा पुरेशी नाही. विज्ञान प्रयोगशाळांची अवस्था दयणीय आहे. संशोधनासाठी आवश्यक रसायने नाहीत. या अडचणी आधी सोडवा. त्यानंतर बायोमॅट्रीक हजेरी लागू करा. तो पर्यंत या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कुलगुरूंशी चर्चेचा आग्रह, पोलिसांची मध्यस्थीसंशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी, महिला या निर्णयाला विरोधासाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आल्या. यावेळी पोलिसांचे पाचारण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंसोबत चर्चेचा आग्रह धरला. मात्र, कुलगुरूंनी केवळ प्रतिनीधींना भेटीची परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून ८-१० पीएचडी नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांना भेटी आत सोडले. त्यावेळी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनीधींनी नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाबायोमेट्रिक हजेरी निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी कुलगुरूंची भेट घेत अडचणी सांगितल्या. हा लढा फक्त बायोमेट्रिक हजेरी निर्णय स्थगिती पुरताच मर्यादित नाही. गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी आवश्यक मूलभूत सुविधा मिळवण्याची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या पाहीजे.-सत्यजित म्हस्के, संशोधक विद्यार्थी
बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्यचयुजीसीचा निकष, शासन वेळोवेळी माहीती मागवते. त्यामुळे बायोमॅट्रीक हजेरीचा निर्णय मागे घेता येणार नाही. बायोमॅट्रीक हजेरी अनिर्वायच असेल. विभागांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवू. ३०० संगणक, आवश्यक पुस्तके मागवली आहेत. संशोधन केंद्रावर पाणी, बसण्याची व्यवस्थाही युद्धपातळीवर उपलब्ध करून देवू.-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद