शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

काॅर्पोरेट क्षेत्रातील संधीमुळे विद्यापीठात वाढले मानव्य विद्याशाखेत संशोधक

By योगेश पायघन | Published: January 31, 2023 6:27 AM

मानव्य विद्याशाखेत ४३.५६ टक्के, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत ३२.४ टक्के संशोधक विद्यार्थी

- योगेश पायघनऔरंगाबाद : बदलते शैक्षणिक धोरण, फेलोशिपचे आर्थिक पाठबळ, मार्गदर्शकांची वाढलेली संख्या आणि काॅर्पोरेट क्षेत्रात गुणवत्तेच्या संशोधनाला निर्माण झाल्याने मानव्य विद्या शाखेत संशोधकांचा आलेख लक्षणीय उंचावला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या ७,७४४ विद्यार्थ्यांचे पीएच.डी संशोधनासाठी सध्या नोंदणी आहे. त्यापैकी तब्बल ३,३७४ अर्थात ४३.५६ टक्के संशोधकांची नोंदणी मानव्य विद्या शाखेतील आहे.

पदव्युत्तर पदवीनंतर पीएच.डी केल्यावर केवळ अध्यापन नव्हे, तर खासगी, संशोधन आणि सेवा क्षेत्रात करिअरच्या संधी संशोधनकर्त्यांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत सर्वाधिक असलेले संशोधकांची संख्या होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत हे चित्र हळूहळू बदलल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. याविषयी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ.पी.व्ही. देशमुख म्हणाले, विविध फेलोशिपचे पाठबळ, काॅर्पोरेट सेक्टरमधील संधी, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा मानव्य विद्या शाखेतून विविध विषयांत संशोधनाकडे वाढता कल दिसत आहे.

१९६२ ते २००९ पर्यंत ३,०९४ जणांनी संशोधन पूर्ण केले. त्यात सर्वाधिक संशोधन हे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील आहेत. २००९ ते २०२२ पर्यंत ४ हजार ४,४६० जणांनी संशोधन पूर्ण केले. त्यात मानव्य विद्या शाखेतील विषयातील संशोधन वाढलेले दिसते, तर नव्याने नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचाही कल या शाखेत वाढलेला आकडेवारीवरून स्पष्ट होतो. शहरात ५८ तर जिल्ह्यात ९३ संशोधन केंद्रे आहेत. त्यापैकी ४४ केंद्र विद्यापीठातील विभागात आहेत. बीडमध्ये ४१, जानला येथे ३०, उस्मानाबाद येथे १४ अशा १७८ संशोधन केंद्रांवर सध्या संशोधन सुरू आहे. देशात सर्वाधिक संशोधक विद्यापीठात संशोधन करत असून, ही वाढती संख्या लक्षात घेऊन कालमर्यादेत संशोधन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी साॅफ्टवेअर युनिककडून विकसित करून घेतले. प्रत्येक टप्प्यावरील संशोधनाची अपडेट स्थिती त्याद्वारे घेतली जात आहे. विद्यापीठाने आता सर्व संशोधक विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. मात्र, अनेक जण बायोमेट्रिकमुळे अर्थवेळ संशोधक होण्याच्या प्रयत्नात असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मार्गदर्शक, जागा वाढल्या...पूर्वीपेक्षा पीएच.डी मार्गदर्शकांची संख्या वाढली, त्यामुळे जागा वाढल्या. याशिवाय विद्यार्थ्यांचा मानव्य विद्या शाखेत पीएच.डीकडे कल वाढला असून, शासकीय पाठबळ मिळाल्याने संशोधक वाढले आहेत. गुणवत्तापूर्ण समाजोपयोगी संशोधनाला अध्यापनच नव्हे, तर इतर खासगी, सेवा क्षेत्रांत संधी असल्याने हे चित्र बदलत आहे.- डाॅ.श्याम शिरसाठ, प्र कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

पीएच.डी संशोधनाची मानव्य विद्या शाखेतील स्थितीविषय - गाइड - जागा - पीएच.डी नोंदणी - रिक्त जागाअर्थशास्त्र -८१ -४७२ -२७५ -२०२इतिहास -८३ -४५० -३२५ -१४६मराठी -१२० -७१८ -५०९ -२४९इंग्रजी -१०७ -५५४ - ४७२ -१२९भूगोल -६९ -३१६ -१९१ -१३६हिंदी -११७ -६७२ -२६९ -४०३विधि -१६ -९४ -६१ -३६संस्कृत -३ -२० -१८ -२उर्दू -१५ -७४ -५९ -१८अरेबिक -४ -१४ -७ -७पाली ॲण्ड बुद्धिझम -१ -४ -५ -०राज्यशास्त्र -७१ -४०२ -३०५ -१०६समाजशास्त्र -५८ -३०० -१९० -१२०मानसशास्त्र -३० -१४२ -८९ -५८पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन -४३ -२१८ -८७ -१३३(स्रोत : युनिक पोर्टल)

अशी आहे पीएच.डी. नोंदणीशाखा -नोंदणी -पूर्णवेळ -अर्धवेळविज्ञान व तंत्रज्ञान -२५०९ -१५६९ -९४०आंतरविद्याशाखीय अभ्यास - ११४४ -७७१ -३७३मानव्यविद्या - ३३७४ -२४८८ -८८६वाणिज्य व व्यवस्थापन -७१७ -५२८ -१८९

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण