पैठण (औरंगाबाद) : नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील १२ प्रभागातील २५ जागेसाठी सोमवारी पंचायत समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत काढण्यात आली; यामुळे प्रत्येक प्रभागात एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे नगर परिषदेतील दोन दिग्गज नगर सेवकांना फटका बसला असून त्यांना परत नगर परिषदेत जाण्यासाठी इतर प्रभागाचा मार्ग अवलंबवा लागणार आहे.
पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, मुख्याधिकारी हंतोस आगळे, यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. यानुसार प्रभाग क्रमांक १ (शिवनगर नारळा ), प्रभाग क्रमांक ३ ( इंदिरानगर), प्रभाग क्रमांक ७ ( लक्ष्मी नगर) व प्रभाग क्रमांक ९ (भाजी मार्केट ) हे प्रभाग अनुसूचित जाती करीता राखीव झाले आहेत.
बारा प्रभागापैकी एक ते अकरा या प्रभागात प्रत्येकी एक महिला तर प्रभाग क्रमांक बारा मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेल्यात प्रभागा पैकी प्रभाग क्र तीन (ईंदिरानगर ) व प्रभाग क्र ९ ( भाजीमार्केट) या प्रभागात अनुसूचित महिलासाठी एक - एक जागा राखीव निघाली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण..... प्रभाग क्र १ शिवनगर नारळा... अ) महिला सर्व साधारण. ब) अनुसूचित जाती पुरूष. प्रभाग क्र २ नवामोंढा रामनगर... अ) सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र ३ इंदिरानगर..... अ) अनुसूचित जाती महिला.. ब) सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्र ४ नवीन कावसान... अ) महिला सर्वसाधारण. ब) सर्वसाधारण पुरुष. प्रभाग क्र ५ हुतात्मा स्मारक... अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण पुरूष प्रभाग क्र ६ परदेशीपुरा / जैनपुरा.... अ) सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र ७ लक्ष्मीनगर.... अ) सर्वसाधारण महिला. ब) अनुसूचित जाती पुरूष.प्रभाग क्र ८ नाथगल्ली / साठेनगर अ) सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण पुरूष प्रभाग क्र ९ भाजीमार्केट.... अ) अनुसूचित जाती महिला. ब) सर्वसाधारण पुरूष..प्रभाग क्र १० दारूसलाम अ) सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण पुरुष. प्रभाग क्र ११ नेहरू चौक अ) सर्वसाधारण महिला. ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र १२ रंगारहाटी/ कुच्चर ओटा.. अ) सर्वसाधारण महिला. ब)सर्वसाधारण महिला. क) सर्वसाधारण पुरुष.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभेत उपस्थित असलेले भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी अचानक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षण सोडत सभेचा धिक्कार करीत असून राज्य शासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर भाजप कार्यकर्ते व सुरज लोळगे सभागृहातून बाहेर पडले. दरम्यान, सोडतीसाठी सभागृहात माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, शिवसेना शहरप्रमुख तुषार पाटील, गौतम बनकर कल्याण भुकेले, महेश जोशी, संतोष सव्वाशे, हसन्नोद्दीन कटयारे, जालिंदर आडसूल, अजित पगारे, कृष्णा मापारी, इरफान बागवान, अंबादास ढवळे, सुरेश शेळके, अजिम कटयारे यांच्यासह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.