औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनंतर पोलीस निरीक्षकांची खांदेपालट झाली. या दोन्ही बदलानंतर सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश निघाले आहेत. यामध्ये शहर पोलिसात नव्याने दाखल झालेल्या सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह शहरातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ( Reshuffle in Auranagbad city police; Order for transfer of Assistant Inspector of Police, Sub-Inspector)
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या आदेशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. सायबर पोलीस ठाण्याचा पदभार गौतम पातारे यांना देण्यात आला आहे. सहायक निरीक्षकांच्या बदलामध्ये गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अमोल सातोदरकर यांची सायबर, उपायुक्ताचे वाचक वामन बापुराव बेले यांची आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी, जवाहरनगर येथील श्रद्धा वायदंडे यांची सिडको, सिडकोचे शेषराव खटाणे यांची पुंडलिकनगर, क्रांतीचौक येथील शांतीलाल राठोड यांची वाहतूक शाखा, राहुल सूर्यतळ यांची क्रांती चौक येथून उस्मानपुरा, घनश्याम सोनवणे यांची पुंडलिकनगर येथून विशेष शाखा, वनिता चौधरी यांची मुकुंदवाडीतून जवाहरनगर, नितीन कामे यांची हर्सुल येथून क्रांतीचौक, पंकज बारवाल यांची उस्मानपुरा येथून वाहतूक शाखेत, रामेश्वर चव्हाण यांची वाचक कक्षातून एएचटीयू कक्षात, अमोल ढोले यांचे एएचटीयूमधून पोलीस आयुक्ताचे वाचक म्हणून बदली केली आहे. याशिवाय शहराबाहेरुन आयुक्तालयात आलेले सहायक निरीक्षक अनिल मगरे यांची जिन्सी, प्रभू ठाकरे यांची वाहतूक शाखा आणि सुधीर वाघ यांची जवाहरनगर येथे नेमणूक करण्यात आली आहे.
उपनिरीक्षकांच्या बदल्या पुढील प्रमाणे :