औरंगाबाद: गायरान आणि ईनामी, वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना याप्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले, गावंडे आणि कटके यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर सोरमारे, राजपूत, लवांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जमिनीच्या व्यवहारांबाबत पैठण येथील भाऊसाहेब काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावरून डॉ.भापकर यांनी उपजिल्हाधिकारी पांडूरंग कुलकर्णी यांच्यामार्फत २२५ जमिनींच्या व्यवहाराची चौकशी केली. चौकशीअंती पूर्ण प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान हे प्रकरण सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील गाजले.