लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : ‘हरित सिडको स्वच्छ सिडको’ अंतर्गत सिडको प्रशासन-मसिआ व बजाज आॅटो यांनी गोलवाडी टेकडी विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१४) गोलवाडी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन गोलवाडी टेकडी विकासाबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. टेकडीच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले. लवकरच विकासकामाला सुरुवात होणार असून, ही टेकडी पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.सिडको प्रशासनाने गोलवाडी टेकडीचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी टेकडीवर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. या मोहिमेत गोलवाडीतील नागरिकांनाही सहभागी करून त्यांच्यावर झाडाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सिडको प्रशासनाने गोलवाडी येथे बैठक बोलावली. सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण, मसिआचे सुनील किर्दक, बजाज आॅटोचे सतीश त्रिपाठी यांनी गोलवाडी टेकडीच्या विकासासंदर्भात माहिती देऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.जुलैच्या पहिल्या आठवड्यात विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या बैठकीला सिडकोचे गजानन साटोटे, कपिल राजपूत, माधव सूर्यवंशी, मसिआचे देशमुख, गोलवाडीच्या सरपंच मनीषा धोंडरे, माजी सरपंच राजेंद्र जैस्वाल, बाबासाहेब धोंडरे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तिरछे, संजय सातपुते, सुनील कीर्तिशाही, रमेश कणिसे, देवीलाल मुंगसे, राम सलामबाद, पूनम सलामपुरे, सोमनाथ गायकवाड, गोपाल सलामपुरे आदींसह गावकऱ्यांची मोठी उपस्थितीहोती.
गोलवाडी टेकडीच्या विकासाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:05 AM