बीड : शुल्क त्रुटीचा बाऊ करत पाच हजारांपैकी सतराशे निराधार लाभार्थ्यांना बीड तहसीलदारांनी डावलले होते. याला कडाडून विरोध होत असल्याचे लक्षात येताच बीड तालुका प्रशासनाने डावलेल्या निराधारांच्या ‘त्या’ सतराशे प्रस्तावांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश काढले आहेत.याबाबत ‘लोकमत’ ने गुरुवारी वृत्त प्रकाशित, केले तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले व निराधारांनी तालुका प्रशासनाच्या निर्णयाचा कडाडून विरोध करीत तहसीलदारांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेताच बीडच्या तहसीलदारांनी निराधारांच्या ‘त्या’ डावलेल्या प्रस्तावाची पुनर्तपासणी करून त्रुटींची यादी नोटीस बोर्डवर लावून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी, अशा सूचना शुक्रवारी बीड तहसीलदार यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या.
निराधारांचे प्रस्ताव निघणार निकाली
By admin | Published: January 29, 2016 11:57 PM