शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
3
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
5
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
6
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
8
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
9
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
10
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
11
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
12
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
13
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
14
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
15
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
16
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
18
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
19
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
20
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

शेतकरी संपाला प्रतिसाद

By admin | Published: June 02, 2017 12:39 AM

जालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजीपाला, दूध विक्री थांबवून जिल्ह्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जालना तालुक्यातील रोहनवाडी, रेवगाव, कुंबेफळ, इंदेवाडी, बाजीउम्रद, काजळा आदी गावच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध विक्री न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, जालना मोंढ्यात सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आला. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविला.शहराच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. तसेच याच गावांतून शहरामध्ये दूध विक्रीस जाते. दूरवरच्या गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन न घेता शेतकरी अन्य पीक उत्पादनाकडे वळलेले असल्याने तेथून भाजीपाला विक्रीसाठी जात नाही. शहरालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहर परिसरातील रोहनवाडी, इंदेवाडी, बेथलम, रेवगाव, कुंबेफळ, राममूर्ती, देवमूर्ती आदी गावांतून जालना मोंढ्यात भाजीपाला विक्रीस येतो. शेतकरी संपाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने काही काही जणांनी खरबूज विक्रीसाठी मोंढ्यात आणले. परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनातून खरबूज काढून रस्त्यावर फेकणे सुरु केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी संपाची तीव्रता फारशी जाणवली नसली तरी उद्यापासून शेतकरी पूर्णत: संपात उतरतील, असा दावा शेतकरी संघटनेचे बबनराव गवारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.तालुक्यातील रोहनवाडी येथील महिला बचत गटाने सुरु अरुनिमा गाय दूध गट ही दूध डेअरी बंद ठेवलीे. तर भाजीपाला उत्पादनक शेतकरी सुभाषराव तनपुरे, शंकर तनपुरे, उदयभान तनपुरे, रामकिसन मैंद, दत्ता गजर, नामदेव तनपुरे, बंडू तनपुरे हे संपात सहभागी झाल्याची माहिती बाळासाहेब तनपुरे यांनी दिली. काजळा येथे सकाळी भाजीविक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांनी गावातच रोखले. आजपासून कोणीही भाजीपाला तोडणार किंवा विक्रीसाठी न्यायचा नाही, असा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला. काजळा येथे जवळपास २०० लिटर दूध उत्पादन आहे. परंतु ते शहरात जात नाही, अशी माहिती संजय शेंडगे यांनी दिली. या संपात सहभागी होण्याचे आवाहन शेंडगे यांच्यासह विशाल मदनुरे, शिवाजी शिंदे, लक्ष्मण पघळ, भरत खोटे, शिवाजी वाल्हुरे, प्रल्हाद पडूळ यांनी केले आहे. काजळा येथे वांगी, शेपुची भाजी, कोबी, पालक, मेथी, हिरवी मिरची अशा प्रकारचा ८ ते ९ पोते भाजीपाला उत्पादीत होतो. गुरुवारी सकाळी विक्रीसाठी जाणारा हा भाजीपाला गावातच थांबविण्यात आला. त्यासोबत वांग्याचे १४ कॅरेटही होते, असे शेंडगे यांनी सांगितले.कुंबेफळ (ता.जालना) येथील ज्येष्ठ शेतकरी नेते बबनराव गवारे सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश आहे. शेतकरी संपाला गावातून प्रतिसाद मिळत आहे. गावातून शहरात विक्रीसाठी जाणारा भाजीपाला थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण कर्जमाफी अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील मच्ंिछद्र मदन यांनी कोबी विक्री थांबवून शेतकरी संपात सहभाग घेतला. अन्य शेतकरीही संपात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील बाजीउम्रद, ब्राह्मणखेडा येथेही शेतकरी संपाबाबत आवाहन करण्यात आल्याचे गौरव पडूळ यांनी सांगितले.बदनापूर शहरात शेतकरी संघटना, शिवसेना व शेतकऱ्यांनी संपात सहभाग नोंदवित ५० लिटर दूध रस्त्यावर सांडवून दिले. या आंदोलनात देवजी जऱ्हाड, बाबासाहेब पवार, अंबादास कोळसकर, आसाराम शेळके, उद्धव खैरे, गणेश सिरसाठ, गणेश जऱ्हाड सहभागी झाले होते.अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही राजकीय पक्षांनी एकत्र येत रास्ता रोको केला. यावेळी संपूर्ण कर्जमुक्ती, डॉ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा, शेतमालास उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा आधारित दीडपट हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी के. एल. तांबोळी यांना देण्यात आले. आंदोलनात सुरेश काळे, बापूराव खटके, श्रीमंत खटके, पंडित गावडे, किरण तारख, बाबासाहेब गावडे, पांडुरंग उढाण, बंडूभाऊ मैद, पंढरीनाथ खटके, जगन खटके, दत्तात्रय खैरे, राधकीसन पवार सुभाष भोईटे आदी उपस्थित होते.