लोकमत न्यूज नेटवर्क जालना : बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाऱ्या आॅनलाइन औषधी विक्री व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीस विरोधात मंगळवारी औषधी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला. यात सहभाग घेत जालना केमिस्ट असोसिएशनने शहरातील सर्व औषधी दुकाने बंद ठेवली. दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता काही औषधी दुकाने सुरू ठेवण्यात आली. शहरातील दवा बाजारातील सर्व होलसेल औषध विक्रेत्यांसह मेडीकल आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले होते. दुपारी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ई-फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेली बेकायदेशीर औषध विक्री बंद करावी, नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधी, गर्भपाताच्या गोळ्यांची होणारी आनलाइन विक्री थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल खंडेलवाल, सुनील शेळके, सचिव संजय बोबडे, सुधीर मंत्री, रामेश्वर कौटकर, सुभाष जगताप, सहसचिव संजय मोरे, संदीप राठी, तालुका अध्यक्ष दिलीप दानी, जितेंद्र लखोटिया, राम चव्हाण, संपर्क प्रमुख आनंद वरियानी, राजेद्र्र दायमा, अनिल लदनिया, प्रेमेंद्र अग्रवाल, जयंत साबळे, सचिन चरखा, सत्तू सारडा, महावीर सोडाणी, बीरज करवा, विनोद काबरा, गोपाल बांगड, भास्कर पवार, मनोज कुमकर, धनंजय वझरकर, दशरथ पडूळ, तुकाराम डोंगरे, ललित गिते, कैलास आदींची उपस्थिती होती.
जालना शहरात औषधी विक्रेता संघटनेच्या बंदला प्रतिसाद
By admin | Published: May 30, 2017 11:40 PM