जपानमध्ये नोकरीकरिता प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. परंतु, तेथील नोकऱ्या प्राप्त करण्याकरिता जपानी भाषा येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील तरुण वर्गाला या संधी प्राप्त व्हाव्यात याकरिता एईजीतर्फे जपानी भाषा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
जपान येथील उद्योजक मिलिंद गुडदे यांनी मार्गदर्शन केले. गुडदे हे मागील २० वर्षांपासून जपान येथे स्थायिक आहेत. विद्यार्थ्यांनी २ ते २.३० तास गुडदे यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा केली.
माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुपचे भूषण रामटेके, भास्कर शिंदे, युवराज भांडवलकर यांचीही भाषणे झाली. त्याचबरोबर डॉ. हर्षवर्धन दवणे व डॉ. रवी सरोदे यांनीही मार्गदर्शन केले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून प्रशिक्षित झालेले नितीन साळवे यांची विशेष उपस्थिती लाभली. भीमराव वायवळ आणि बाबासाहेब कवठेकर आणि एईजी ग्रुप सदस्यांनी परिश्रम घेतले.