शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

जिल्हा बंदला प्रतिसाद

By admin | Published: November 16, 2014 12:17 AM

बीड : मराठा आरक्षणाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती़ याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले़ मराठा आरक्षण सम्नवय समितीने पुकारलेल्या बंदला

बीड : मराठा आरक्षणाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती़ याचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले़ मराठा आरक्षण सम्नवय समितीने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ शहर दिवसभर कडकडीत बंद होते़ इतर तालुक्यांमध्येही आंदोलने झाली़ रॅली, घोषणांनी संपूर्ण जिल्हा दणाणून गेला़शासकीय विश्रामगृहापासून सकाळी ११ वाजता रॅलीला सुरुवात झाली़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, साठे चौक, सुभाष रोड, अहिल्यादेवी पुतळा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेसमार्गे नगर रोडवरुन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली़ तेथे निदर्शने करण्यात आली़ त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले़ राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी़ त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निमंत्रक अशोक हिंगे यांनी केली़ माजी आ़ राजेंद्र जगताप, रावसाहेब मस्के, विनोद इंगोले़, गणेश बजगुडे, भाऊसाहेब डावकर, अशोक सुखवसे, सचिन मुळूक, अ‍ॅड़ महेश धांडे, किशोर पिंगळे, शैलेश जाधव, सुनील सुरवसे, शरद चव्हाण, संतोष जाधव, विजय लव्हाळे, सचिन उबाळे, युवराज जगताप, राहुल दुबाले, विजय लव्हाळे, मुकुंद गोरे, युवराज मस्के, राहुल वाईकर, गणेश नाईकवाडे, गंगाधर काळकुटे, विनोद चव्हाण, संगमेश्वर आंधळकर, गणेश मस्के, संकेत मस्के, नागेश तांबारे आदी सहभागी झाले होते़ तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालये, व्यापारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले़ त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ सुभाष रोड, भाजीमंडई, नगररोड, जालनारोडवरील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला़ बीड तालुक्यातील घाटसावळी येथेही आंदोलन झाले़ हॉटेल, दुकाने दिवसभर बंद होती़धारुर कडकडीत बंदआरक्षणप्रश्नी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला़ अ‍ॅड़ परमेश्वर शिनगारे, सुरेश फावडे, राम चव्हाण, अ‍ॅड़ मोहन भोसले, सुरेश शिनगारे, सुरेश शेळके, मनोज भोसले, गणेश थोरात, अनंता भोसले, बापू खामकर, पवन तट, बंडू फावडे यांनी बंदचे आवाहन केले़ त्यानंतर तहसीलकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ नायब तहसीलदार के़ आऱ गेंदले यांना निवेदन देण्यात आले़शिरुरमध्येही पडसादयेथील व्यापरपेठ सकाळपासूनच बंद होती़ आरक्षणप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी न्यायालयात कणखरपणे बाजू मांडावी, या मागणीसाठी शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली़ किशोर खोले, हनुमंत गायकवाड, सुनील झेंड, बाबूराव शिंदे, सूर्यकांत आमले, अनंत काटे, भागवत मोरे, राम गायकवाड, बाळू गायकवाड यांनी बंदचे आवाहन करुन तहसीलदारांना निवेदन दिले़ पाटोदा येथेही आंदोलन करण्यात आले़ व्यापारपेठ कडकडीत बंद होती़ बंद दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त होता. (प्रतिनिधींकडून)