ग्रामपंचायतीच्या स्तरावर ग्रामसेवकांनी ग्रामदक्षता समित्या स्थापन करून गावातील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी या समितीवर सोपवावी. या समित्यांनी कोरोना नियंत्रणाचा कारभार पाहावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना रुग्ण असलेल्या गावात तातडीने जास्तीत जास्त कोविड चाचण्या करून एका रुग्णाच्या मागे २० जणांच्या चाचण्या कराव्यात, तसेच एकही रुग्ण नसलेल्या ग्रामपंचायतींनी संपूर्ण गावाचे लसीकरण करावे. उपचार करून घरी परतलेले रुग्ण नियम पाळत नसतील तर ग्राम दक्षता समितीने या रुग्णांवर कारवाईसाठी प्रस्तावित करण्याचे अधिकार ग्रामदक्षता समित्यांना देण्यात आले आहे. विनाकारण गावात फिरणाऱ्यांवर ग्रामदक्षता समितीने दंडाची कारवाई करावी, असे आदेशात नमूद आहे.
चौकट
...तर कारवाई केली जाईल
ग्रामीण भागात ग्रामसेवक जीव धोक्यात घालून कोरोना नियंत्रणाचे काम करत आहे. मात्र, इतर विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे ग्रामसेवकांना सहकार्य मिळत नसेल तर त्यांनी कळवावे. त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.