औरंगाबाद : मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मागील वर्षभरापासून प्रयोगावर प्रयोग सुरू केले आहेत. नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाला एकत्र करून उपअभियंता ए.बी. देशमुख यांची अतिक्रमण हटाव प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. देशमुख यांच्या कार्यकाळात अनधिकृत प्लॉटिंगसह बीड बायपासवर सर्व्हिस रोडसाठी मोठी कारवाई करण्यात आली. आता त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे साधारणपणे वर्षभरात तब्बल १२०० ते १४०० तक्रारी प्राप्त होतात. यातील मोजून १०० तक्रारींचीही प्रशासन दखल घेत नाही. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, पार्किंग बळकावणे आदी ठिकाणी मनपाने नोटीस देऊन कारवाईचा बडगा उगारला तर राजकीय मंडळी माझ्याच वॉर्डात कारवाई का म्हणून मनपाच्या पथकाला अक्षरश: पिटाळून लावतात. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचे स्वातंत्र्य कधीच देण्यात आले नाही. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामावरून ओरड करण्यासाठी नगरसेवकच पुढे असतात. प्रत्येक ठिकाणी कारवाई करण्यासाठी अतिक्रमण हटाव विभागाला नगररचना विभागाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे मनपा आयुक्तांनी दोन्ही विभाग एकत्र केले होते. आता उपअभियंता ए.बी. देशमुख यांची अतिक्रमण हटाव विभागातून मुक्तता करण्यात आली. त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांना मालमत्ता अधिकारी म्हणून पदस्थापना दिली असून, त्यांना उद्यान विभाग, पशुसंवर्धन विभाग, स्पर्धा परीक्षा केंद्राचे विभागप्रमुख केले आहे.दरम्यान, नगररचना विभागातील अनुरेखक संजय कपाळे यांची सातारा वॉर्ड कार्यालयात बदली करण्यात आली. त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आॅनलाईन पद्धतीने देण्याची प्रक्रिया सोपविली होती.
अतिक्रमण हटावची जबाबदारी सहायक आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:18 AM
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मागील वर्षभरापासून प्रयोगावर प्रयोग सुरू केले आहेत. नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाला एकत्र करून उपअभियंता ए.बी. देशमुख यांची अतिक्रमण हटाव प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. देशमुख यांच्या कार्यकाळात अनधिकृत प्लॉटिंगसह बीड बायपासवर सर्व्हिस रोडसाठी मोठी कारवाई करण्यात आली. आता त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त पंकज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देदेशमुख यांची मुक्तता : नगररचना विभागातून कपाळे यांचीही बदली