सोमनाथ खताळ, बीडबसस्थानकातील महिला विश्रांतीगृहाची दुरावस्था झालेली आहे़ येथील बसस्थानकातील महिला वाहकांच्या विश्रांतीगृहाची दुरावस्था झाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले होते़ तसेच विश्रांतीगृह असुरक्षित असल्याचे लोकमतने समोर आणले होते़ याची दखल घेत अवघ्या महिनाभरात महिला वाहकांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह उभारल्याने समाधान व्यक्त होत आहे़कामावरून परत आल्यानंतर काही काळ विश्रांती मिळावी म्हणून प्रत्येक बसस्थानकात महिला वाहकांसाठी विश्रांतीगृह बांधण्याचे नियोजन आहे़ मात्र जिल्ह्यातील कुठल्याच बसस्थानकात महिला वाहकाच्या विश्रांतीगृहाची व्यवस्था चांगली नाही़ ही विश्रांतीगृहे केवळ शोभेची वास्तू बनली होती़बीड बसस्थानकातील महिला विश्रांतीगृहाची तर दुरावस्था पाहता कुठलीच महिला कर्मचारी येथे राहण्यास थांबणार नाही, अशी परिस्थिती होती़ विश्रांतीगृहाच्या भिंती पडलेल्या होत्या, परिसरात घाणीचे साम्राज्य होते, पंखेही नव्हते़ त्यामुळे येथे महिला वाहक विश्रांतीसाठी थांबत नव्हत्या़ ड्युटी संपल्यानंतर अनेक महिला वाहकांनी किरायाच्या खोल्या करून बीड शहरात राहणे पसंत केले होते़ महिला वाहकांच्या जिव्हाळ्याचा विश्रांतीगृहाचा गंभीर प्रश्न लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा करून मार्गी लावला आहे़१० आॅगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तामधून विश्रांतीगृह महिलांसाठी कसे असुरक्षित आहे यावर प्रकाश टाकण्यात आला होता़ याची दखल घेत अवघ्या तीन दिवसांत संबंधित विभागाने इमारतीच्या दुरुस्तीला सुरूवात केली होती़ त्यानंतर महिनाभरातच या इमारतीचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी, शौचालयाची व्यवस्था, पंखे, गाद्या, पिण्याच्या पाण्याची सोय अशी व्यवस्था करण्यात आली आहे़जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांमध्ये परिस्थती आजही बिकट असल्याचे दिसून येत आहे़ माजलगाव, अंबाजोगाई, आष्टी या तालुक्यांमध्ये महिला वाहकांसाठी कुठलीही सुरक्षितता नसल्याने या भागात ड्युटी करण्यास महिला वाहक टाळाटाळ करीत आहेत़(प्रतिनिधी)
विश्रांतीगृह बनले अद्ययावत !
By admin | Published: September 14, 2014 11:41 PM