औरंगाबाद : ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पूर्ववत होईपर्यंत औरंगाबाद महापालिकेसहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी मंगळवारी येथे नॉन पोलिटिकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंटच्यावतीने करण्यात आली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विभागीय आयुक्तांमार्फत यासंदर्भात निवेदन देण्यात आले. माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे व माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटले. ग. ह. राठोड, बापू घडामोडे, सरस्वती हरकळ, प्रवीण घुगे, अशोक पगार, महादेव आंधळे, कचरू वेळंजकर, मिर्झा अब्दुल कयुम नदवी, श्रीरंग ससाणे, रामभाऊ पेटकर, सुरेश आगलावे, पंडितराव तुपे, संजय खंबायते, अशोक दामले, गोविंद केंद्रे, पंडित कांदे, समीर सावजी, दिलीप थोरात, प्रा. राम बुधवंत, रामनाथ मंडलिक, डॉ. संदीप घुगरे, विष्णू वाखरे यांच्या निवेदनावर सह्या आहेत, तर जगदीश चव्हाण, उत्तम साबळे, श्रीकांत धीवारे, किशोर शेलार, बबनराव पवार, कैलास लांडगे, गणेश अवचार, अश्वमेध पवार, मोहन बोरूडे, भारत गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती.