लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षीचा गणेशोत्सव आदर्श व अविस्मरणीय साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. तसेच ३६ ध्वनीमापक यंत्रांची मिरवणुकीत नजर राहणार आहे. जो ‘आवाज’ करेल त्याच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.मागील १५ दिवसांपासून जिल्हा पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव, बकरी ईदसाठीच्या बंदोबस्ताचे नियोजन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांसह प्रभारी अधिकारी, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्यांना सूचना देण्याबरोबरच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने इको-फ्रेंडली गणपती बसविण्यासंदर्भात मंडळांना बैठकांमधून प्रोत्साहित केले जात आहे. व्यर्थ खर्च न करता सामाजिक कार्य व उपक्रमावर खर्च करण्यासंदर्भात मंडळांकडून प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मंडळांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.बीडमध्ये डीजेमुक्तीचा निर्धारलोकमत न्यूज नेटवर्कबीड : लाडक्या बाप्पाचे स्वागत पारंपरिक वाद्यांने करून हा गणेशोत्सव डीजेमुक्त वातावरणात साजरा करण्याचा निर्धार बीडमधील गणेश मंडळांनी व्यक्त केला आहे. सोमवारी शहरातील मंडळांची शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले.सोमवारी बीडमधील जुन्या एस.पी. आॅफिसलगतच्या संगम हॉलमध्ये पेठबीड, शिवाजीनगर व शहर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांसह लोकप्रतिनिधींनी बैठक घेण्यात आली. त्यांना नियोजन आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, अनुराधा गुरव, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सय्यद सुलेमान, अनिल जाधव उपस्थित होते.
‘आवाज’ करायचा नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:48 AM