लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविध मागण्यांसाठी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाचा बुधवारी दुस-या दिवशी घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर ५० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दररोजपेक्षा ५० टक्के रुग्णांना देण्यात आली. नियमितच्या ४० शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.घाटी रुग्णालयात परिचारिकांसह विविध श्रेणीतील कर्मचाºयांनी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेसह इतर संघटनांच्या माध्यमातून मंगळवारपासून संप पुकारला आहे. घाटी रुग्णालयात पहिल्या दिवशी सध्या वर्ग ३ चे ६५९ कर्मचारी आणि वर्ग ४ चे ५४६ संपात सहभागी झाले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातील ५० आणि खाजगी नर्सिंग कॉलेजच्या ५० विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. घाटी रुग्णालयातील ८ परिचारिका आणि वर्ग ३ चे ६६ कर्मचारी कामावर होते. दररोज बाह्यरुग्ण विभागात जवळपास ३ हजार रुग्णांना सेवा दिली जाते. ती बुधवारी १९२९ नोंदवली गेली. आंतररुग्ण विभागात ३०० रुग्ण येतात, तर बुधवारी १४९ रुग्ण आले होते. दोन गंभीर आणि किरकोळ स्वरूपाची एक शस्त्रक्रिया करण्यात आली. अस्थिरोग, नेत्ररोग, नाक, कान व घसा या विभागांत एकही शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. स्त्रीरोग विभागात २ सिझर आणि ९ नैसर्गिक प्रसूती झाली. एमआयआर २०, एक्स रे २५, सिटी स्कॅन १७ आणि सोनोग्राफी १०० करण्यात आल्या. तसेच पॅथॉलॉजीमध्ये १८८, जीवशास्त्र १२६६ आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागात १७२ चाचण्या करण्यात आल्या.क्विक रिपॉन्स टीम स्थापनमराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर क्विक रिपॉन्स टीम तयार ठेवण्याची सूचना पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्राद्वारे केली. त्यानंतर उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या नेतृत्वाखाली सहा डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. तसेच एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांचे हे पथक गुरुवारी गंभीर व किरकोळ जखमींवर उपचार करणार आहे.
औरंगाबादेत रुग्णसेवेवर झाला संपाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:57 AM
विविध मागण्यांसाठी परिचारिकांसह कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या तीनदिवसीय संपाचा बुधवारी दुसºया दिवशी घाटी रुग्णालयातील रुग्णसेवेवर ५० टक्के परिणाम झाल्याचे दिसून आले. बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात दररोजपेक्षा ५० टक्के रुग्णांना देण्यात आली. नियमितच्या ४० शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.
ठळक मुद्देदुसरा दिवस : खाजगी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची घाटी रुग्णालयात मदत