२६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात बहुजन समाजासाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला. तो दिवस सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कॅनॉट प्लेस, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी हा ठराव करण्यात आला. व यासंदर्भात व आंतरजातीय विवाहितांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३-३० वा. विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्याचे ठरले.
आरक्षण: काल, आज आणि उद्या’ या विषयावर ॲड.महादेव आंधळे व विचारवंत अंबादास रगडे यांनी आपली मते मांडली. प्रारंभी, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाहीर उत्तम म्हस्के यांनी क्रांती गीत गायिले. गुणवंत कामगार विश्वनाथ जांभळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग सादर केले. कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन केले. मारोती साळवे यांनी आभार मानले. के. ई. हरिदास, एस.एम. थोरे, कॉ. बुद्धिनाथ बराळ, हुशारसिंग चव्हाण, कांचन सदाशिवे, प्रा. कीर्तीलता पेटकर, विष्णू वखरे, महेंद्रकुमार दांडगे, सचिन करोडे, टी.एस. चव्हाण, दुर्गादास गुडे, किशन पवार, सूरज जाधव, पूजा जाधव, प्रियंका नाडे, राम सुपेकर, सना गायकवाड, के.जे. त्रिभुवन, जगन्नाथ सुपेकर, महेंद्रकुमार दांडगे, जगन्नाथ गवई, नाना कोळी, क. रा. मोकळे, आर.जी. देठे, संजय चिकसे आदींची उपस्थिती होती.