न्या. नाईक यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला होता. त्यांनी १८ ऑगस्ट १९७० पासून मुंबईत उच्च न्यायालयात आणि २६ ऑगस्ट १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि मॅटमध्ये वकिली केली. १९८० ते १९८५ दरम्यान सहायक सरकारी वकील म्हणून आणि १९८६ ते १९८९ पर्यंत राज्य शासनाचे अ वर्ग वकील म्हणून काम पाहिले. १९७७ ते १९८० दरम्यान ते मुंबईच्या के. सी. महाविद्यालयात अर्ध वेळ अध्यापक म्हणून कार्यरत होते. २२ जानेवारी २००१ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती व २१ जानेवारी २००३ रोजी कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले होते. ते २७ ऑक्टोबर २००५ ला निवृत्त झाले होते.
निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:02 AM