उस्मानाबाद : धाराशिव कारखान्याकडील कर म्हणून वसूल केलेल्या रक्कमेतील साडेचौदा लाख रूपये चोराखळी ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ या निर्णयामुळे चोराखळी ग्रामपंचायतला मोठा निधी उपलब्ध होणार असून, याद्वारे गावातील विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरपंच अॅड़ मिराजी मैंदाड यांनी सांगितले,याबाबत अॅड़मिराजी मैंदाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील चोराखळी गावच्या शिवारात धाराशिव साखर कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन सरपंच अॅड़ मिराजी मैंदाड यांनी मालमत्ता कर ग्रामपंचयतीला मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता़ पंचायत समितीपासून ते ग्रामविकास मंत्रालयस्तरावरही ग्रामपंचयतीच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता़ तर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याकडून २८ लाख,९८ हजार २७५ रूपये वसूल केले़ मात्र, कारखान्याने यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यामुळे वसूल झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर ठेवण्यात आली होती़ याबाबत औरंगाबाद खंडपीठाने वसूल रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम चोराखळी ग्रामपंचायतीकडे जमा करण्याचे व उर्वरित रक्कम औरंगाबाद खंडपीठात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ याप्रकरणी ग्रामपंचायतच्या वतीने अॅड़ सुशात चौधरी, अॅड़सागर फटाळे यांनी, जिल्हा परिषदेकडून अॅड़प्रशांत दामा, अॅडग़णेश कोरे तर शासनाकडून व्ही़ए़शिंदे यांनी काम पाहिले़ या प्रकरणाची अंतीम सुनावणी २१ जून रोजी होणार असल्याचेही अॅड़मैंदाड यांनी सांगितले़ दरम्यान, या निधीमुळे गावातील विकास कामे करण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे़ (प्रतिनिधी)
कराचे साडेचौदा लाख ग्रामपंचायतीला परत द्या
By admin | Published: June 16, 2014 12:25 AM