लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने मंगळवारी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. घनसावंगी, भोकरदन, परतूर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. घनसावंगी तालुक्यातील देवीदेहगाव लघुतलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी दिवसभरात झालेल्या पावसामुळे अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आला होता. जाफराबाद, अंबड, बदनापूर तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.जालना तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पहाटे पाचच्या सुमारास सुरू झालेली संततधार आठ वाजेपर्यंत सुरू होती. दिवसभर अधून-मधून हलक्या सरी कोसळल्या. तालुक्यातील पानशेंद्रा, जामवाडी, गुंडेवाडी, गोंदेगाव, माळशेंद्रा, निधोना, पीरपिंपळगाव, वंजारउम्रद, धावेडी, अंहकारदेऊळगाव, सिरसवाडी, दरेगाव, तांदूळवाडी या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा कपाशी व तूर पिकांना फायदा होत आहे.वालसावंगी : भोकरदन तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वालसावंगीत दिवसभरात दमदार पाऊस झाल्यामुळ नदी-नाल्याना पूर आला. पावसामुळे पद्मावती धरणाच्या पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. गावात सखल भागात पाणी साचल्यामुळे सर्व रस्ते चिखलमय बनले. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरील मैदानात पाणी साचल्याने विद्यार्र्थ्यांची गैरसोय झाली. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी शेतकºयांना सोंंगणी केलेली सोयाबीन व मका तापडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावी लागली.
पारध पसिरात मुसळधार पाऊससरासरी ६२१ मिलीमिटर पाऊसमंगळवारी सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात ३.५० मिलीमीटर, बदनापूर तालुक्यात ४.४०मि.मी., भोकरदन १२.७५मि.मी., जाफराबाद २०.२० मि.मी., मंठा १६. ००मि.मी., अंबडमध्ये ११.१४मि.मी. तर घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ३१.५७ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ६२१.८५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊसघनसावंगी : दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर घनसावंगी तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील नदी-नाले दुधडी भरून वाहिले. पावसाच्या तखाड्यामुळे काही भागात शेतीपिकांचे नुकसान झाले. तीर्थुपरी, कुंभारपिंपळगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.तालुक्यात सोमवारी रात्री विजांच्या कडकटासह सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर अधून-मधून विश्रांतीघेत सुरूच राहिला. त्यामुळे शेतीपिकांमध्ये पाणी शिरले. तीर्थपुरी, कुंभारपिंपळगाव, राणीउंचेगाव, रांजणी, अंतरवाली, जांबसमर्थ या महसूल मंडळात सरासरी ३१. ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली, सिद्धेश्वर पिंपळगाव, तनवाडी, मांदळा येथील लघू तलाव ९० टक्के भरले आहेत. देवीदहेगाव येथील लघू तलाव दुपारी तीन वाजता ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे सांडव्यातून पाणी वाहिले. आजूबाजूच्या शेतातील पिकांचे यामुळे नुकसान झाले. पावसामुळे कपाशीची बोेंडे काळी पडत असल्याचे काही शेतक-यांनी सांगितले. दरम्यान, परतीच्या पावसामुळे विहिरी, लघू तलाव, नद्यांना पाणी आल्यामुळे रबी हंगामातील ऊस, हरभरा व गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे.शहागड : पैठणचे जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्याने धरणाची खबरदारी म्हणून गोदावरी नदीपात्रात पंधरा हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोमवारी रात्री शहागड बंधा-यापर्यंत पोहोचले. त्यामुळे या बंधा-यातून मंगळवारी गोदावरी नदीपात्रात दुस-यांदा पाणी सोडण्यात आले.तीन महिन्यांत गोदावरी नदीला तीन वेळा पूर आला आहे. नदी पात्रात अगोदरच पाणी असल्याने जायकवाडी रात्री धरणातून सोडलेले पाणी शहागडला येण्यासाठी उशीर लागला नाही. मंगळवारी पहाटेपासून शहागडसह परिसरात बारावाजेपर्यंत संततधार बरसल्याने नदीच्या पाण्यात भर पडली. त्यामुळे गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे, तर बंधा-याचे काही दरवाजे उघण्यात आले आहेत. भोकरदनशहर व परिसरात मंगळवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. भोकरदन पोलीस ठाण्यासह काही सरकारी कार्यालयांत गळती लागल्याने पावसाचे पाणी साचून कर्मचाºयांचे काम बंद पडले होते.भोकरदन तालुक्यात मंगळवारी परतीच्या पावसाने अचानकपणे जोरदार हजेरी लावली या पावसामुळे शेतकरी वगार्ची दैना उडाली आहे.काढनी सुरू असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच परंतू शेतात मोठ्या प्रमामाणात कापुस वेचणीला आला असून त्यासाठी मजूर मिळत नसल्याने या पावसाने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.