शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:18 IST

या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देनांदेडजवळ पुलावरून दुचाकीस्वार वाहून गेला  खरिपातील हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान

औरंगाबाद : जुलै, आॅगस्टमध्ये सर्वांना तरसायला लावणाऱ्या वरुणराजाने जाता जाता बहुतेक सर्वांना खुश करून टाकले. या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या पावसाचा रबी पिकांनाही फायदा होणार आहे. मात्र काहीशा चुकीच्या वेळी त्याच्या आगमनाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, बाजरी अशा बहरलेल्या खरीप पिकांचे वाटोळे करून बळीराजाच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला. नांदेड जिल्ह्यात पुरामुळे एक दुचाकीस्वार पुलावरील पुरात वाहून गेला. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगाव, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, पैठण, खुलताबाद, फुलंब्री, औरंगाबाद तालुक्यात मंगळवारी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक परतीच्या पावसाने हजेरी लावली.विशेष म्हणजे जिल्ह्यात काही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून यामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून मका, बाजरी, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हिंगोलीत पिकांचे नुकसानहिंगोली :  जिल्ह्यात शनिवार व रविवारी विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मंगळवारीही अनेक ठिकाणी पाऊस झाला. मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. हिंगोली शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जोराचा पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूरीचे मोठे नुकसान झाले आहे. सेनगाव, वसमत, हट्टा, जवळा बाजार, औंढा नागनाथ, येहळेगाव आदी भागांत पाऊस झाला आहे.  शेतकऱ्यांची सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. अशातच आलेल्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले आहे. तसेच ज्वारीही काळी पडली आहे. रबी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस जरी उपयोगी असला तरी खरिपातील पिके हाता- तोंडाशी आल्यानंतर सतत पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८९२ मि.मी. असून आजपर्यंत ६२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊसजालना शहरासह जिल्ह्याभरात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पाणी आले आहे. अंबड तालुक्यात रिमझिम पाऊस झाला.च् परतूर तालुक्यात १५.४० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील  कुंभारझरी, नळविहिरा, सावंगी, वरखेडा येथेही मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे मका, सोयाबीन व कापूस या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

बीडमधील वडवणी तालुक्यात अतिवृष्टी बीड जिल्ह्यात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांना पाणी आले आहे. वडवणी तालुक्यातील वडवणी मंडळात ९८ तर कौडगाव मंडळात १०३ मिमी पाऊस झाला. येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर माजलगाव धरणात १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमिवर होणाऱ्या आठवडे बाजारावरही परिणाम झाला. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात  सरासरी २९ मिमी पावसाची नोंद झाली.  च्बीड तालुक्यात ३०.१ मि.मी.,पाटोदा९.३,आष्टी २.४, गेवराई ३२ मि.मी.,शिरु र ११.७ मि.मी., वडवणी १००.७ मि.मी,  अंबाजोगाई १३.६, माजलगाव ४८.२, केज १३.६, धारु र ३९.७ तर परळी तालुक्यात १८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

नांदेडमध्ये  दुचाकीस्वार वाहून गेलामुक्रमाबाद (जि. नांदेड):  लेंडी नदीवरील पुलावरुन जाताना रावी तालुका मुखेड येथील हनुमंत लक्ष्मण बडगणे हा २५ वर्षीय मोटारसायकलस्वार मोटारसायकलसह वाहून गेला. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुक्रमाबाद येथून दोन किमी अंतरावर नांदेड ते बीदर राष्ट्रीय महामार्गावर घडली. मुक्रमाबाद येथून दोन किलोमीटर अंतरावर नांदेड ते बीदर हा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. वाहतुकीसाठी येथे एक छोटासा पुल बनविण्यात आला आहे. पावसामुळे या पुलावरुन दोन फूट पाणी वाहत होते. रावी तालुका मुखेड येथील हनुमंत लक्ष्मण बडगणे हा तरुण मोटारसायकलवरून आपल्या पत्नी व मुलाना घेऊन गंगाखेड जिल्हा परभणी येथील सासुरवाडीकडे जात होता. 

पुलाजवळ पत्नी व मुलांना पलीकडे सोडल्यानंतर तो मोटारसायकल ठेवण्यासाठी परत अलिकडे येत होता. तेवढ्यात पाण्याच्या लोंढ्याने तो मोटारसायकलसहित वाहून गेला. माहिती मिळाल्यानंतर मुक्रमाबादचे सपोनि. कमलाकर गडिमे, बीट जमादार शिवाजी आडेकर, माधव जळकोटे, बाळू इंद्राळे यांनी स्थानिकांना सोबत घेऊन त्याचा शोध घेतला असता ५० फूट अंतरावर मोटारसायकल सापडली. मात्र उशिरापर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसWaterपाणीfloodपूर