प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला फायदा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच राज्य सरकारला याचा मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद विभागात तब्बल २८८ कोटी रुपयांनी महसूल घट झाली आहे.वार्षिक दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांची केंद्रीय व राज्य जीएसटीत विभागणी झाल्यामुळे राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीस उद्या १ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मागील वर्षभरातील राज्य जीएसटीच्या औरंगाबाद विभागातील कामगिरीची आकडेवारी समोर आली आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्हे मिळून राज्य जीएसटीत औरंगाबाद विभाग तयार झाला आहे. नवीन कर रचनेनुसार वार्षिक दीड कोटीच्या वरील उलाढाल असणाऱ्या करदात्यांपैकी ५०-५० टक्के करदाते केंद्रीय व राज्य जीएसटीत विभागले गेले. दीड कोटीच्या आतील उलाढाल असलेले ९० टक्के करदाते राज्य जीएसटीकडे, तर १० टक्के करदाते केंद्रीय जीएसटीकडे विभागणी केले आहे. या करदात्यांच्या विभागणीचा फटका राज्य जीएसटीच्या औरंगाबाद विभागालाही बसला आहे. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात व्हॅटअंतर्गत २५३६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. मागील आर्थिक वर्षात १ जुलै २०१७ ते १ मार्च २०१८ या कालावधीत जीएसटीद्वारे २२४८ कोटीचाच महसूल प्राप्त झाला. मागील वर्षाच्या तुलनेत औरंगाबाद विभागात २८८ कोटी रुपयांनी राज्य सरकारचा महसूल कमी झाला आहे.६७८९ नवीन करदाते वाढलेविक्रीकर विभाग असताना व्हॅटअंतर्गत २६१२३ करदात्यांची नोंदणी झाली होती. विक्रीकर विभागाचे रूपांतर वर्षभरापूर्वी राज्य जीएसटी विभागात झाले. जीएसटीची अंमलबजावणी सुरूझाल्यानंतर औरंगाबाद,जालना व बीड येथील करदात्यांची संख्या ३ लाख २९ हजार बारा इतकी झाली. म्हणजेच वर्षभरात ६७८९ नवीन करदात्यांची राज्य जीएसटीत नोंदणी झाली आहे.विवरणपत्र न भरणाºयांची संख्याही अधिकराज्य जीएसटीअंतर्गत औरंगाबाद विभागात ६७८९ नवीन करदाते जोडल्या गेले.विवरणपत्र दाखल न करणाºयांची संख्या अधिक आहे, अशा विवरणपत्र कसूरदारांचा शोध घेण्यासाठी २८ जून ते ६ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविली जात असल्याची माहिती राज्य जीएसटीचे उपायुक्त आनंद पाटील यांनी दिली.जीएसटी वर्षपूर्ती सोहळा आजजीएसटी या करप्रणालीचा पहिला वर्षपूर्ती सोहळा रविवार,(दि. १)होत आहे. यानिमित्ताने सिडकोतील केंद्रीय जीएसटी आणि एक्साईज आयुक्तालयाच्या इमारतीत सकाळी ११.३० वाजता सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद विभागात २८८ कोटींनी घटला महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:31 AM
जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला फायदा झाल्याचे स्पष्ट होत असतानाच राज्य सरकारला याचा मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद विभागात तब्बल २८८ कोटी रुपयांनी महसूल घट झाली आहे.
ठळक मुद्देजीएसटीचा राज्य सरकारला फटका : केंद्र व राज्य जीएसटीत करदात्यांची विभागणी