‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

By स. सो. खंडाळकर | Published: August 7, 2023 04:29 PM2023-08-07T16:29:45+5:302023-08-07T16:53:01+5:30

आधी हे सरकार ईडी (एकनाथ- देवेंद्रचं) होतं. आता ते ईडीए (एकनाथ, देवेंद्र व अजित) झालेलं आहे.

'Reverse, reverse... I am Nanach, Lok Sabha and Vidhan Sabha elections under my leadership' | ‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘माझे नाव नाना पटोले आहे. ते उलट करा, सुलट करा, नानाच राहणार आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष बदलाच्या या केवळ वावड्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, अशी स्पष्ट ग्वाही रविवारी पत्रपरिषदेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष बदलणार यात कितपत तथ्य आहे, असे विचारले असता, पटोले यांनी असे आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सध्या चालू आहे, हे आम्ही बघायचे कारण नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दुपारी नागपूरहून पटोले यांचे आगमन झाले. सुभेदारी गेस्ट हाउसवर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. नंतर ते शहर महिला काँग्रेसतर्फे क्रांती चौकात आयोजित मणिपूरबाबतच्या निदर्शनात सामील झाले. तेथून पदमपुऱ्यात चर्मकार बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेले. शहर किसान सेलचे महेंद्र रमंडवाल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पत्रपरिषदेत त्यांनी आरोप केला की, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात डबल इंजिन सरकार असूनही यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. ते सध्या त्यांच्या बगलबच्च्यांच्या एजन्सीमार्फत नोकरभरती करीत आहेत. यातून पैसे उकळण्याचा त्यांचा धंदा सुरू आहे.
सरकारने अद्यापही अवकाळी पावसाने क्षतिग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. नाही. आधी हे सरकार ईडी (एकनाथ- देवेंद्रचं) होतं. आता ते ईडीए (एकनाथ, देवेंद्र व अजित) झालेलं आहे. कोण आमदार नेमके कुणाकडे, हे विधानसभा अध्यक्षही सांगू शकले नाहीत. या सरकारचं अपयश वाढलं आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारशीत भावाभावांमध्ये लढवण्याची भूमिका दिसते. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ते न करण्याचे पाप भाजप करते, असा आरोप पटोले यांनी केला.

त्यांनी सांगितले की, काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा, जनतेचा पक्ष आहे. यांनी काँग्रेसमुक्त भारतचा नारा लावला होता. आता यांनाच सत्तेतून मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. मोदी, शाह संघ प्रचारक आहेत. अधूनमधून फेरफटका मारायला व संघाचा प्रचार करायला महाराष्ट्रात येत असतात. यावेळी डॉ. कल्याण काळे, शेख युसूफ, अनिल पटेल, एम. एम. शेख, नामदेवराव पवार, डॉ, जितेंद्र देहाडे, हमद चाऊस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 'Reverse, reverse... I am Nanach, Lok Sabha and Vidhan Sabha elections under my leadership'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.