औरंगाबाद : पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ आणि २०२८ साली होणारे आॅलिम्पिक लक्षात घेऊन त्याच्या पूर्वतयारीसाठी या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय शिबिरासाठी पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींची निवड करण्यात आली आहे.रिद्धी व सिद्धी हत्तेकर या बहिणींनी या वर्षी आगरतळा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेती कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे सिद्धी हत्तेकर हिने गतवर्षी ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करीत विशेष ठसा उमटवला आहे, तर रिद्धी हत्तेकर हिने गतवर्षी व यंदा झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखताना पदके जिंकली आहेत. या कामगिरीची दखल घेऊन त्यांची आॅलिम्पिक पूर्वतयारीसाठी आयोजित शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षक म्हणून महेंद्र बाभूळकर यांची निवड करण्यात आली आहे.रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जिम्नॅस्टिकचे प्राथिमक धडे तनुजा गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आहेत. सध्या या दोघी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करीत आहेत. रिद्दी व सिद्धी हत्तेकर या दोघी शारदा मंदिर कन्या प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत आहेत. या निवडीबद्दल साईच्या संचालिका सुश्मिता ज्योत्सी, उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, पिंकी देब, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, महाराष्ट्र अॅम्युचअर जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, अध्यक्ष संजय शेटे, औरंगाबाद जिम्नॅस्टिक संघटनेचे संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, आदित्य जोशी, रणजित पवार, विशाल देशपांडे, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे, क्रीडा शिक्षिका हेमलता जगताप यांनी रिद्धी, सिद्धी हत्तेकर यांचे अभिनंदन केले आहे.
रिद्धी, सिद्धी यांची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:52 AM
पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २०२४ आणि २०२८ साली होणारे आॅलिम्पिक लक्षात घेऊन त्याच्या पूर्वतयारीसाठी या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय शिबिरासाठी पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीची घेतली दखल : पतियाळा येथे आॅलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी झाली औरंगाबादच्या खेळाडूंची निवड