शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोघांना सश्रम कारावास व दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:26 PM

महेबूब गौरी (१७) या मुलाचा आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. महेबूबला मारहाण करणारे प्रशांत केशवराव म्हस्के (३६, रा. न्यू नंदनवन कॉलनी) आणि प्रमोद जयवंतराव निर्मल (३२, रा. शिवूर, ता. वैजापूर) या दोघांना सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ‘सदोष मनुष्यवधाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (रोमन-दोन) अन्वये प्रत्येकी साडेचार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : महेबूब गौरी (१७) या मुलाचा आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. महेबूबला मारहाण करणारे प्रशांत केशवराव म्हस्के (३६, रा. न्यू नंदनवन कॉलनी) आणि प्रमोद जयवंतराव निर्मल (३२, रा. शिवूर, ता. वैजापूर) या दोघांना सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ‘सदोष मनुष्यवधाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (रोमन-दोन) अन्वये प्रत्येकी साडेचार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात महेबूबचे वडील अ‍ॅड. गुजरशाह अली गौरी (४७, रा. देवगिरी कॉलनी, क्रांतीचौक) यांनी तक्रार दिली होती की, ३१ डिसेंबर २०१५ रोजी महेबूब गौरी हा प्रशांत म्हस्के, प्रमोद निर्मल व तीन मैत्रिणींसह नववर्षाच्या पार्टीसाठी बीड बायपास येथील एका हॉटेलात गेले होते. तेथे महेबूब व दोघे आरोपी दारू प्याले. महेबूबला दारू जास्त झाल्याने आरोपींनी त्याला घराजवळ सोडले. तसेच महेबूबच्या मैत्रिणीलासुद्धा आरोपींनी घरी सोडले.त्यानंतर आरोपी व त्यांच्या दोन मैत्रिणी बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये गेले. महेबूबला त्याची मैत्रीणदेखील आरोपींसोबत असल्याचा संशय आला. तो त्यांच्यापाठोपाठ लॉजवर गेला. तेथे त्याने आरोपींकडे त्याच्या मैत्रिणीबाबत विचारपूस केली असता आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत आरोपींनी त्याला लॉजवरील जनरल रूममध्ये ठेवले. महेबूब हालचाल करीत नसल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने दोघा आरोपींना सांगितले व त्याला घाटी दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले.त्यानुसार आरोपींनी महेबूबला घाटी दवाखान्यात नेले. समर्थनगर येथील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेलो असता तेथे अज्ञात मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला दवाखान्यात आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून एमएलसी दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता वरील सर्व घटना उघडकीस आली. यासंदर्भात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात मयताची मैत्रीण, लॉजचे कर्मचारी व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा व दंड, प्रशांत म्हस्के याला कलम २०१ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम १८२ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड ठोठावला.----------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय