शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

विमानतळावर घुसखोरीचा धोका

By admin | Published: June 15, 2016 11:51 PM

संतोष हिरेमठ, औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच सुरक्षेच्या घेऱ्यात असते. परंतु काही आगंतुक ही सुरक्षा यंत्रणा सहज भेदत आहेत.

संतोष हिरेमठ, औरंगाबादचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेहमीच सुरक्षेच्या घेऱ्यात असते. परंतु काही आगंतुक ही सुरक्षा यंत्रणा सहज भेदत आहेत. पण ही कोणी माणसे नसून ती मोकाट कुत्री आहेत. गेल्या आठ महिन्यांत विमानतळावर ९० कुत्री पकडण्यात आली. संरक्षक भिंतीची उंची, भिंतीजवळच बांधण्यात आलेली घरे, भिंतीखालून वाहणारी नाली, यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घातपाताच्या इराद्याने कोणीही सहज घुसखोरी करू शकतो. विमानतळाच्या याच परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.विमानतळाच्या धावपट्टीवर फिरणाऱ्या ३ मोकाट कुत्र्यांमुळे मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण तब्बल सव्वातास लांबले. धावपट्टीवर आलेल्या या कुत्र्यांना जेरबंद केल्यानंतरच या विमानाचे टेकआॅफ झाले. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ७३ प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. याबाबत चिकलठाणा विमानतळाच्या प्रशासनाचीही तक्रार आहे. ही समस्या विमानतळ प्राधिकरणासाठी सर्वाधिक गंभीर बाब आहे. विमानतळाच्या हद्दीत घुसणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे धोकादायक परिस्थितीला तोंड देण्याची वेळ विमानतळ प्रशासनावर येत आहे. मोकाट कुत्रे विमानतळाच्या हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. परंतु केवळ श्वानपथकाला पाचारण करून मोकाट कुत्री पकडण्यावर भर दिला जात आहे. आतून १० फूट; बाहेरून ४ फुट भिंतविमानतळाच्या चोहोबाजूंनी जवळपास १५ कि. मी. लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत महत्त्वाची आहे. परंतु आजघडीला संरक्षक भिंतीच्या परिस्थितीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. विमानतळाच्या हद्दीतून संरक्षक भिंतीची उंची १० फुटांची आहे. परंतु विमानतळाच्या हद्दीबाहेर मात्र, ठिकठिकाणी संरक्षक भिंतीची उंची अवघ्या ४ ते ५ फुटांची आहे. त्यामुळे कोणालाही विमानतळाच्या हद्दीत डोकावता येत आहे. अशा कमी उंचीच्या ठिकाणाहून मोकाट कुत्री सहज विमानतळाच्या परिसरात प्रवेश करू शकतात.लँड होणारे विमान झेपावलेआॅगस्ट २०१४ मध्ये कुत्र्यांमुळे लँड होता होता विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली होती. मुंबईहून येणारे विमान धावपट्टीवर उतरत होते. चाके धावपट्टीवर टेकणार असे वाटत असताना अचानक विमानाने वेग घेतला आणि पुन्हा हवेत झेपावले. या घटनेने १३० प्रवासी गोंधळून गेले. मोकाट कुत्र्यांचा वावर पाहता या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अधिक आहे. दुर्घटना झाल्यास परवाना निलंबितविमानतळावर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ‘डीजीसीए’ने आपले नियम अधिक कडक केले आहेत. यामध्ये विमानतळावर एखादी दुर्घटना झाल्यास थेट विमानतळाचा परवाना निलंबित केला जातो. त्यामुळे अशी परिस्थिती उद््भवू नये, यासाठी मोकाट कुत्र्यांचा होणार प्रवेश, अनधिकृत बांधकामे, उंच झाडे, नाले यांसह अन्य परिस्थितीचा गंभीरतेने विचार करण्याची गरज असल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत नमूद केले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री मोकाट कुत्र्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर बुधवारी मनपा आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांची प्रमुख उपस्थिती होती.