शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कानाची काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती होते गायब

By संतोष हिरेमठ | Published: June 27, 2024 1:53 PM

कानाचे आरोग्य धोक्यात, गायिका अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेल्यानंतर एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच चार दशकांपासून आपल्या सुमधुर गायकीने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांची अचानकपणे श्रवणशक्ती गेल्याचे समोर आले. त्यामुळे याविषयी एकच चर्चा सुरू आहे. मात्र, शहरात महिन्याला शंभरावर लोकांची श्रवणशक्ती अचानक गायब होते. ‘व्हायरल इन्फेक्शन’सह काही इतर कारणांनी असे होते, शिवाय सतत हेडफोन, इअरफोन वापरत असाल आणि तेही मोठ्या आवाजात तर त्याचा वापर कमी करावा, आवाज कमी ठेवावा. नाही तर बहिरेपणा येण्याचा धोका नाकारता येत नाही, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणाले.

अगदी ध्यानिमनी नसताना अचानक एका किंवा काही वेळा दोन्ही कानांची ऐकू येण्याची क्रिया बंद पडते. शास्त्रीय भाषेत या आजाराला ‘ सडन सेन्सोरी न्यूरल हेअरिंग लाॅस’ असे नाव आहे. सध्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना झालेल्या या आजारामुळे सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. ‘लोकमत’ने विविध कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेल्या महिनाभरात अचानक बहिरेपणा आलेल्या रुग्णांची संख्या जाणून घेतली, तेव्हा ही आकडेवारी चिंतादायक असल्याचे समोर आले. अचानक बहिरेपणा येणे हा आजार दुर्मीळ नसून, बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो, असेही कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात कान-नाक-घसा तज्ज्ञ- ६५

१०० पैकी ३० टक्के रुग्णांना हेडफोन, इअरफोनचे दुखणेकोरोना प्रादुर्भावानंतर कानाचे दुखणे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी नमूद केले. वर्क फ्राॅम होममध्ये आणि त्यानंतरही वाढलेला हेडफोनचा वापर, मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने, तसेच वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळेही बहिरेपणा वाढत आहे. शहरातील ईएनटी तज्ज्ञांकडे येणाऱ्या शंभर रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे हेडफोन, इअरफोनचे दुखणे घेऊन येत आहेत.

का होते असे?अनेक प्रकारचे विषाणू, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, वयोमानानुसार येणाऱ्या बहिरेपणासह ‘डीजे’च्या खूप मोठ्या आवाजाने, हेडफोन लावून सतत मोठा आवाज कानावर पडत राहिल्याने आणि अशा आणखी काही कारणांनी ही व्याधी उद्भवते.

इमर्जन्सी उपचार आवश्यकज्याप्रमाणे हृदयविकार किंवा अर्धांगवायू या आजारामध्ये इमर्जन्सी उपचार आवश्यक असतात. त्याचप्रमाणे, अचानक उद्भवलेल्या बहिरेपणामध्येही गरजेचे असते. सुरुवातीला दिलेल्या या उपचाराने फायदा न झालेल्या रुग्णांना श्रवणयंत्र, ‘काॅक्लिअर इम्प्लांट’सारख्या शस्त्रक्रियांचा पर्याय उपलब्ध आहे. अचानक आलेल्या बहिरेपणाचे निदान केल्यानंतर जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तितका त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.- डाॅ.रमेश राेहिवाल, माजी राज्य अध्यक्ष, कान-नाक-घसा तज्ज्ञ संघटना.

घाटीत महिन्याला ५ ते ६ रुग्णकान-नाक-घसा विभागात महिन्याला अचानक बहिरेपणा आलेले ५ ते ६ रुग्ण येतात. बहुतेक वेळा ‘व्हायरल इन्फेक्शन’मुळे असे होते. योग्य वेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजैविकांनी उपचार केल्यास श्रवणशक्ती पुन्हा मिळू शकते.- डाॅ.सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealth Tipsहेल्थ टिप्स