लोकमत न्यूज नेटवर्कआडूळ : आगामी एक वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून गाव व तालुका संपूर्णपणे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.घारेगाव येथे सुखना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ राम यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. संदीपान भुमरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलमामा लहाने, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, सतीश सोनी, उपविभागीय कृषी अधिकारी कुलथे, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन, पं. स. सदस्या कावेरी सोपान थोरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, जि.प. सदस्य प्रकाश चांगुलपाये, मार्केट कमिटीचे माजी सभापती विलास गोरे, मुरलीधर चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, पं.स. सदस्य शुभम पिवळ, हरिश्चंद्र लघाने, दादा बारे, ख.वि. संघाचे चेअरमन बाबुराव पडुळे, तेजराव लहाने आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आडूळच्या सरपंच शेख शमीम नासेर, उपसरपंच अलका बनकर, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन नारायण थोरे, घारेगावचे सरपंच रामेश्वर थोरे, उपसरपंच अशोक बारगळ, माजी उपसरपंच सोपान थोरे, संदीपान पवार, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भाऊसाहेब वाघ, घारेगाव पिंप्रीच्या सरपंच पार्वताबाई शिंगाडे, विठ्ठल गलधर, घारेगाव एकतुनीच्या सरपंच कुशावतार्बाई काजळे, शरद कुलकर्णी, सुरेश कतारे, संदीप थोरे,भगवान थोरे, शेख नासेर, रामकिसन वाघ, काकासाहेब थोरे, भरत फटांगडे, गोपीनाथ थोरे, ग्रामसेवक किरण वानखेडे, विजय थोरे, नंदलाल थोरे, श्रीमंत थोरे, शेख समीर आदींसह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सोपान थोरे यांनी केले तर आभार मदन लहाने यांनी मानले.जलयुक्त शिवारमुळे टँकरची संख्या घटलीगेल्या काही दिवसात जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील ९० टक्के टँकरची संख्या कमी झाली असून आगामी एका वर्षामध्ये गाव, तालुका दुष्काळ व टँकरमुक्त करू तसेच या भागातील अपूर्ण राहिलेले जलसंधारणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शेतकºयांना शेतीसाठी प्रथम पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाचा आहे. कारण शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर कोरडवाहू क्षेत्र कमी होऊन शेतकरी बागायती पिके घेऊन सुखी राहील, असे ते म्हणाले.
नदी पुनर्भरण प्रकल्प राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:13 AM