लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दैठणातील शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी संतप्त शेतकºयांनी आज रास्ता रोको शहरातील अंबड चौफुलीवर रास्ता रोको केला. महावितरण आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या रास्तारोकोमुळे मार्गावरील वाहतूकी दीड तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील दैठणा शिवारात डिझेल पंप सुरु करताना तीन शेतकºयांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे आज तीव्र पडसाद उमटले. बुधवारी दैठण्यातील संतप्त शेतकºयांनी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अंबड चौफुलीवर रास्तारोको आंदोलन सुरु केले. महावितरण व अधिकाºयांविरुध्द गुन्हे दाखल करुन संबंधिताना अटक करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकांनी घेतला.शेतकºयांच्या इशाºयाने पोलीस प्रशासनही भांबावून गेले. दरम्यान, जि. प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, संतोष मोहिते, अनिल घनवट यांच्यासह शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, संतोष कºहाळे, अॅड. शैलेश देशमुख, अशोक भुतेकर, अशोक पडूळ आदी मंडळी चौफुलीवर दाखल झाली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे आणि पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना निवेदन सादर केले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे तीन शेतकºयांचा मृत्यू झाला असून, वीज पुरवठा सुरळीत असता तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर यांचा समावेश होता.जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन शिष्टमंडळाने शेतकरºयांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतू महावितरणच्या अधिकाºयांना अटक करण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी प्रकरणाच्या चौकशीनंतर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दैठणा येथील घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.सदरील घटनेत बाबासाहेब बापूराव वाबळे (५५), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (२८) व अर्जुन साहेबराव धांडे या तिघांचा मृत्यू झाला. तर परमेश्वर बाबासाहेब वाबळे, अशोक बापूराव वाबळे हे बेशुद्ध झाले होते.
शेतक-यांचा जालन्यात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:16 AM