बाजारसावंगी : बाजारसावंगी ते जैतखेडा रस्त्यावरील वडगावलगत असलेल्या पुलाच्या एका बाजूस मोठे भगदाड पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
बाजारसावंगी ते जैतखेडा कन्नड रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कन्नड आगाराच्या बसेच याच मार्गावरून जातात. पिशोर तांडा, वडाळी या भागातील नागरिक बाजारसावंगी येथे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. दरम्यान, वडगावच्या समोर असलेल्या पुलालगत मधोमध खड्डा पडल्याने अपघातसत्र सुरू झाले आहे. मागील सहा महिन्यापासून हा खड्डा पडलेला आहे. या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीला केराची टोपली दाखविल्याने या खड्ड्यात रात्री-अपरात्री अपघात होऊ लागले आहेत. बळी घेतल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
150621\15_2_abd_55_15062021_1.jpg
वडगाव जैतखेडा