शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

२२५ कोटींतून रस्ते; यादी दोन दिवसांत शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:03 PM

राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देमहापालिकेच्या सभेत झाला निर्णय : सर्व प्रभागातील रस्त्यांना प्राधान्य दिल्याचा दावा

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.जानेवारी महिन्यात शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी त्यांनी १२५ कोटी रुपये रस्त्यांसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार पदाधिकाºयांनी स्वत:च्या धोरणानुसार रस्त्यांची यादी तयार केली होती. प्रशासनाने पदाधिकाºयांच्या रस्त्यांच्या यादीला खो देऊन नवीन यादी तयार केली. त्या यादीचे पीपीटी सादरीकरण आज सभागृहात करण्यात आले. पीपीटीमध्ये काही रस्त्यांची नावे दोनदा आल्याचे सदस्यांनी सभागृहात सांगितले. १०० कोटींतून करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची यादी मध्ये असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. रस्त्यांच्या यादीत बदल करण्यासह २१२ कोटींची यादी २२५ कोटी रुपयांवर नेण्यात आली. त्यात पदाधिकाºयांनी सुचविलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यासह प्रस्ताव मंजूर करण्यात आला.पाणी प्रश्नावरून भाजपचा जेलभरो आंदोलनाचा इशारापाणी प्रश्नावरून भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी वॉर्डातील पाणी प्रश्न सुटला नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा देत सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. तर नगरसेवक नितीन चित्ते यांनी थेट लोटांगण घालून वॉर्डातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी महापौर, आयुक्तांकडे केली. यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. एमआयएम नगरसेवकांच्या निलंबनानंतर अडीच वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून शिवसेनेसह प्रशासनाची कोंडी केली. आयुक्त डॉ. निपुण विनायक, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना याप्रकरणी खुलासा करण्यास महापौरांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, ६७ एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक्स्प्रेस जलवाहिनी टाकली. त्यातून शून्य एमएलडी पाणीदेखील वाढले नाही. आयुक्त म्हणाले, समान पाणी वाटपाबद्दल प्रशासन काम करीत आहे. त्याचे आऊटपूट लवकरच मिळेल. माजी महापौर भगवान घडमोडे, सचिन खैरे, अंकिता विधाते, सत्यभामा शिंदे, सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप यांनी आपापल्या वॉर्डातील पाणी प्रश्न सभागृहात मांडला.-------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक