शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

निवृत्त प्राचार्याचा बंगला फोडून तासाभरातच पळवले ३५ तोळयाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 3:38 PM

निवृत्त प्राचार्याचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेली.

ठळक मुद्दे- छावणी ठाण्यात गुन्हा- चोरट्यांचा शोध सुरू

औरंगाबाद: उच्च शिक्षितांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  नंदनवन कॉलनी येथील रहिवासी निवृत्त प्राचार्याचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेली. हा प्रकार बुधवारी रात्री सहा ते सात वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी छावणी ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी सांगितले की, नंदनवन कॉलनीतील रहिवासी प्राचार्य राजगोपाल सुरवसे हे जळगाव येथील एका महाविद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाले आहेत. नंदनवन कॉलनीत त्यांचा बंगला असून तेथे ते पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा लातूर येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयात वैद्यकीय शाखेत एम.डी.चे शिक्षण घेत आहे. तर मुलगी आणि जावई जालाननगर येथे राहतात. मुलगी शिल्पा एमआयटी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता तर जावई सार्वजनिक बांधकाम विभागात आर्किटेक्ट आहेत. मुलीची दहा वर्षीय मुलगी पैठण रस्त्यावरील अग्रेसन शाळेत चौथीमध्ये शिकत आहे. नातीच्या शाळेत बुधवारी सायंकाळी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रा. सुरवसे  दाम्पत्य आणि मुलगी शिल्पासह बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कार घेऊन  गेले होते. 

शाळेत जाताना त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या समोरच्या हॉलचा दरवाजा लॅच लावून बंद केला होता. शिवाय बाहेरून कडीकोंडाही लावून ते मुख्य लोखंडी गेटला कुलूूप लावून गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडले त्यानंतर मुख्य दरवाजाचे लॅच तोडून बंगल्यात प्रवेश केला. आत गेल्यानंतर लोखंडी कपाट उचकटून त्यातील सुमारे ३५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये चोरून नेले. सात वाजेच्या सुमारास सुरवसे दाम्पत्य घरी  परतल्यानंतर त्यांना चोरीची घटना दिसली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरीPoliceपोलिस