शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धर्मनिरपेक्षतेची पाळमुळ छत्रपतींच्या राज्यकारभारात; विजय चोरमारे यांचे औरंगाबादमध्ये प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:55 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय लढा हा मुस्लिम राजांसोबत होता. त्यात कोणताही धार्मिक वाद नव्हता. शिवाजींचे अंगरक्षकही मुस्लिम होते. तर त्यांच्या दरबारात सर्वजातीय, धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळत होती. खर्‍या अर्थांने धर्मनिरपेक्षतेची पाळमुळे छत्रपतींच्या कारभारात होती, असे प्रतिपादन अभ्यासक विजय चोरमारे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात विजय चोरमारे यांचे ‘श्री छत्रपती शिवराय आणि समकालीन  संदर्भ’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके, शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान मंचावर उपस्थित होते. 

छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहेयावेळी विजय चोरमारे म्हणाले, सध्या भगव्या रंगाची भिती निर्माण झाली आहे. शिवकाळात भगवा म्हणजे विश्वासाचे प्रतिक होता. मात्र आता तिरंगा रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन मुस्लिम वस्त्यांमध्ये धुडगूस घातला जात आहे. छत्रपतींच्या भगव्याला बदनाम केले जात आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही चोरमारे यांनी केले. 

अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. यात त्यांनी भुदल, नौदलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय संचालक डॉ. राम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. शिवजयंती महोत्सवात आयोजित  स्पर्धातील विजेत्यांच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

ढोल, ताशा अन् लेझीम पथकांचे देखावेविद्यापीठात प्रवेशद्वार ते नाट्यगृहापर्यंत शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी भगवे फेट्यासह विशेष पेहराव परिधान केला होता. विद्यार्थिनींनी नऊवारी साड्या नेसून मिरवणूकीत देखावे सादर केले. ढोल, ताशा आणि लेझीम पथकांनी विविध कसरती सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनीही छत्रपतीची प्रतिमा असलेले टिशर्ट घालून कसरती सादर केल्या. सकाळी ९ वाजता निघालेली मिरवणूक तब्बल तिन तासानंतर नाट्यगृहापर्यंत पोहचली. तत्पूर्वी या तैलचित्र मिरवणूकीची सुरूवात कुलसचिव डॉ. साधना पांडे,  डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या उपस्थितीत झाली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८