यासंदर्भात आयोेेजित पत्रपरिषदेत रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी मानसिंग पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या पुरस्कार वितरणाचा ऑनलाइन कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कोविड नियमांचे पालन करुन मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थित होणार आहे. उद्योजक पवार यांनी आतापर्यंत विविध पदांवर उत्तम कार्य केले आहे. त्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर संघटनेचे माजी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष या पदासह अनेक व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक संघटनांच्या विविध पदावर उत्कृष्ट काम करीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. रोटरी क्लबने आतापर्यंत १५ नामवंतांना औरंगाबाद भूषण पुरस्कार दिला आहे. या क्लबने कोविड काळात मास्क वाटपापासून ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बँकपर्यंत सेवा कार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी रोटरीचे मुकुंद सांगवीकर, समीर कानडखेडकर, सुनील बागुल, सतीश लोकणीकर, मिलिंद सेवलीकर, सुरज डुमणे यांची उपस्थिती होती.
कॅप्शन
मानसिंग पवार