लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रोटेगाव-कोपरगावदरम्यान २२ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात येणार आहे. पूर्वी कोकण रेल्वे महामंडळाकडे या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता ‘राईटस् कंपनी लिमिटेड’कडे याचे काम सोपविण्यात आले आहे.राईटस् कंपनीचे महाप्रबंधक के. व्ही. व्ही. रमणमूर्ती यांनी मराठवाडा रेल्वे विकास समितीला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे आणि कंपनीच्या तज्ज्ञांनी रोटेगाव-कोपरगाव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली असून, गुगलच्या साहाय्याने पाहणी करणे सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सदरील रेल्वेमार्गाविषयी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणाचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे.याशिवाय औरंगाबाद-चाळीसगाव दरम्यान ९५ किमीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, औरंगाबाद मार्गे सोलापूर-पैठण मार्गासाठी अद्याप सर्व्हेची परवानगी मिळालेलीनाही.मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, औरंगाबाद मार्गे सोलापूर-पैठण मार्गाबद्दल रेल्वे बोर्डाने स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे बोर्डाने याविषयी स्पष्ट भूमिका घ्यावी.
रोटेगाव-कोपरगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अहवाल नोव्हेंबरअंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:57 AM