लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रोटेगाव ते कोपरगाव या प्रस्तावित नव्या रेल्वेमार्गावर प्रत्येक ६ कि.मी. अंतरावर एक रेल्वेस्टेशन राहणार आहे. यानुसार चार नवीन रेल्वेस्टेशन होतील. या मार्गाचे नकाशे आणि इतर माहिती जानेवारी २०१८ मध्ये समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आजघडीला शिर्डीसाठी मनमाड मार्गे जावे लागते. गेल्या २५ वर्षांपासून रोटेगाव-पुणतांबा या रेल्वेमार्गाची मागणी करण्यात येत होती; परंतु या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा मार्ग तयार करणे हे रेल्वेसाठी अधिक खर्चीक ठरत असल्याने रोटेगाव-कोपरगाव हा पर्यायी मार्ग समोर आला. २४ नोव्हेंबर रोजी रोटेगाव ते कोपरगाव या २२ कि.मी. मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे गेलेला आहे. या मार्गाचे सर्वेक्षण करताना आणखी एक पर्यायी सर्वेक्षण अहवाल सोबत जोडण्यात आला आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या मार्गाच्या संपूर्ण कामास २९६ कोटी खर्च होणार असल्याचे समजते. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी या मार्गासंदर्भात संबंधित कंपनीच्या अधिकाºयांशी चर्चा केली.
रोटेगाव-कोपरगाव मार्गात होतील ४ नवीन रेल्वेस्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:07 AM