शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

बीड शहरानजीक ८० लाखांचे फटाके जप्त

By admin | Published: October 26, 2015 11:58 PM

बीड : शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी फाटा येथील एका दोन मजली इमारतीत पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला.

बीड : शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी फाटा येथील एका दोन मजली इमारतीत पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला. जवळपास ८० लाख रूपयांचा फटाक्यांचा साठा आढळून आला आहे. कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.राजेश तुलसीदास टेकवाणी (रा. सय्यदनगर, बीड), सतीश भगवानआप्पा नगरे (रा. बुरूडगल्ली, बीड), सुनील गोवर्धनदास कुकडेजा (रा. सय्यदनगर, बीड), मयूर हरेश कुकडेजा (रा. सय्यदनगर, बीड), जयकिशन अवतराय टेकवाणी (रा. सहयोगनगर, बीड) व किरण कुलकर्णी अशी ताब्यात घेतलेल्या फटाके विक्रेत्यांची नावे आहेत.जिरेफाट्यानजीक असलेल्या हॉस्पिटलसमोरील शिवशंकर या दुमजली इमारतीमध्ये फटाक्यांचा मोठा साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने त्या ठिकाणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. पहिल्या मजल्यावरील शटरसह १६ खोल्यांमध्ये फटाक्यांचे बॉक्स आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी काही व्यक्तींना बोलावून घेतले.त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा माल ७० ते ८० लाख रूपयांचा असल्याचे त्यांनी मान्य केले. फटाक्यांचा साठा बाहेर काढून पोलिसांनी त्या मालाच्या मोजमापाला सुरूवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)फटाक्याचा साठा करताना त्याचा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावा लागतो. ज्या ठिकाणी साठा करावयाचा आहे. त्याच ठिकाणी तो केला पाहिजे असा नियम आहे.४दुसरा नियम म्हणजे ४५० किलो फटाक्यांचा माल ठेवण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक आढळून आला तर कारवाई होते.४पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जिरेवाडी फाट्यानजीक याच दोन मुद्द्यांवर फटाक्याच्या साठ्यावर छापा टाकला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.