हिंगोली : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचा परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवण्यासाठी रांगेत थांबायची गरज राहणार नाही. बऱ्याच जिल्ह्यात सुरू झालेल्या आॅनलाईन अपॉइंमेंट सोमवारपासून हिंगोलीतही करण्यात येणार आहे. आता परवाना मिळण्याची तारीख आणि वेळ निश्चित होणार असल्याने नाहक फेटेही मारावे लागणार नाहीत. शिवाय दलालांचे हातही भरावे लागणार नाहीत. आधीच परिवहन कार्यालयात सावळा गोंधळ असतो. पैसे फेकल्याशिवाय काम होत नाहीत, हा अनुभव अनेकांना येतो. स्वत: काम होत नसल्यामुळे तिथे दलालांचा वावर वाढला. आजघडीला या कार्यालयास दलालांचा विळखा पडला. आता नव्याने सुरू केलेल्या या योजनेत काहीअंशी का होईना उमेदवारांची पिळवणूक थांबेल. कारण अर्जदाराला या कार्यालयाकडून निश्चित वेळ दिल्या जाईल. सोबत तारीखही दिल्यामुळे नियोजनानुसार अर्जदार कार्यालयात पोहोचू शकेल. तद्नंतर त्याची परीक्षा घेऊन लायसन्सचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे दलालांच्या हातापाया पडण्याची गरज भासणार नाही. दिवसागणिक दीडशेपेक्षाही अधील जणांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)चालू महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही सुविधा देण्याचे नियोजन आखले होते. मात्र बीसएसएनलीची लाईन व्यवस्थीत नसल्यामुळे या योजनेच्या प्रारंभाला विलंब झाला. हिंगोलीतील बीएसएनलची रडबोंब संपण्याच्या मार्गावर नाही. ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन ‘इशू आॅफ लर्निंग लायसन्स टू मी’ हा पर्याय निवडावा. उघडलेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी तसेच बाजूला असलेल्या अॅप्लीकेशन क्रमांक लिहून घ्यावा. नंतर क्रमाक्रमाने अर्जातील माहिती भरावी लागेल. ‘एलएल टेस्ट फॉर आॅनलाईन अॅप्लीकेशनवर क्लिक करावे तिथे जन्मतारीख टाल्यास अर्जदाराच्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभाही देण्यात आली. त्यामुळे लाभार्थिंसाठी ते आता अधिक सोयीचे होईल.
आरटीओही ‘आॅनलाईन’
By admin | Published: September 07, 2014 11:49 PM