लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पेट्रोल, गॅस तसेच अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.देशात आणि राज्यात गेल्या दोन वर्षांत महागाईत सातत्याने वाढच होत आहे. सध्या पेट्रोल आणि गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत आहे. जीवन जगणेही कठीण झाले आहे. याचा निषेध करत सेनेच्या वतीने बुधवारी संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.यावेळी महिला आघाडीच्या वतीने चुलीवर स्वयंपाक करुन वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. यामध्ये महिला आघाडीच्या संगीता बियाणी, वच्छला पुयड, सरिता गायकवाड, निकिता शहापूरवाड, विजया गोडघासे, सरिता बैस, दीपाली उदावंत आदींचा समावेश होता. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, मनोजराज भंडारी, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, महानगरप्रमुख निखिल लातूरकर, प्रदीप जाधव, दत्ता कोकाटे, युवा सेनेचे महेश खेडकर, माधव पावडे, तुलजेश यादव, अवतारसिंघ पहरेदार आदी सहभागी होते़
महागाईविरोधात सत्ताधारीच रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:06 AM