औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वेगाड्यांना, रेल्वेस्टेशनला अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईचा बडगा उगारला. ५१ अवैध विक्रेत्यांसह रेल्वे नियमांचे उल्लंघन क रणाऱ्या १५७ जणांवर कारवाई करून ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
धावत्या रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर अवैधरीत्या खाद्यपदार्थ, शीतपेय, फळे, पाण्याची बाटली चढ्या दराने विकण्यात येत असल्याचे रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वे बोर्डाने अवैधरीत्या विक्री करणाºयांवर कारवाईचे आदेश दिले. आदेश प्राप्त होताच येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ५ जानेवारीपासून रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात आली. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह अस्वच्छता करणे, रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या रेल्वेच्या दरवाजात बसणे, नो पार्किं गमध्ये वाहन उभे करणे, रेल्वेस्टेशन परिसरात धूम्रपान करणे आदींसंदर्भात कारवाई करण्यात आली.
तृतीयपंथीयांवर कारवाईरेल्वेत प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे मागण्याचा प्रकार तृतीयपंथीयांकडून होतो. ५ ते ११ जानेवारीदरम्यान राबविण्यात आलेल्या अभियानात ९ तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली. सहा दिवसांत एकूण १५७ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करून ८३ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.