खुलताबाद : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १५ फेब्रुवारीपर्यंत याद्यांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकºयांना वर्षाकाठी सहा हजार रूपयांची मदत म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकºयांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकºयांची सदरील लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी तलाठी सजा कार्यालयात होत आहे.वास्तविक पाहता तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांनी सोबत गावात जाऊन पात्र शेतकºयांची यादी तयार करायची आहे, परंतु केवळ तलाठीच यासाठी काम करीत असून कृषी सहायक, ग्रामसेवक कुठेच दिसत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.खुलताबाद तालुक्यात शेकडो अल्पभूधारक शेतकरी या योजनेत पात्र ठरणार असले तरी या योजनेची माहिती अद्याप पात्र शेतकºयापर्यंत पोहोचली नाही हे विशेष.सध्या तालुक्यात प्रत्येक तलाठी सजावर तातडीने याद्या तयार करण्याचे काम सुरू असून १५ तारखेला सर्व फायनल याद्या तयार कराव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.शेतकºयांनी द्यावयाची कागदपत्रेआधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, जिल्हा बँकेचा खाते क्रमांक, शेती- गट नं., सर्व्हे नं., क्षेत्र २ हेक्टरच्या आत असल्याचा पुरावा.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची खुलताबादेत धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:24 AM