लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्रामीण भागात सुरू असलेल्या आठ ते दहा तासांच्या भारनियमनामुळे विजेवर चालणारी बहुतांश कामे ठप्प आहेत. याचा सर्वाधिक फटका कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरणा प्रक्रियेस बसला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश सीएसएस सेंटर व ईसेवा केंद्र बंद असल्याने शेतकºयांची धावपळ होत आहे. कर्जमाफी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता; पण शासनाने त्यास मुदतवाढ दिली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ५९ हजार ८७५ शेतकºयांनी नोंदणी केली असून, एकूण एक लाख ७८ हजार २२६ लाभार्थी कुटुंबाची नोंदणी झाली आहे. अद्याप अनेक लाभार्थी शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन झालेले नाहीत.गत चार दिवसांपासून ग्रामीण व शहरी भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू आहे. त्यामुळे आॅलनाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध ग्रामीण भागातील बहुतांश सीएससी सेंटर आठ तास बंद राहत आहे. परिणामी शेतकºयांना ताटकळत बसावे लागत आहे. गुरुवारी सकाळी बहुतांश सेंटरवर शेतकºयांचा रांगा पहायला मिळाल्या.काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जागरण करत कर्जमाफीचे अर्ज आॅनलाइन करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होती, असे सूत्रांनी सांगितले.काही वयोवृद्ध शेतकºयांच्या बोटाचे ठसे मिटल्यामुळे आधार पडताळणी होत नसल्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशा शेतकºयांची अर्ज आॅफलाईन घेण्याची मागणी होत आहे.दरम्यान, सर्व गटसचिवांनी लॅपटॉपच्या मदतीने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना सहकार्य करावे. त्यासाठी लॅपटॉप व अन्य साहित्य भाड्याने घ्यावे, अशा सूचना गटसचिव समितीचे के.जे. पठाण व सुहास साळवे यांनी केल्या आहेत.
कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:58 AM