औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर गेल्या महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर फरशा बदलणे आणि अन्य दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवर रेल्वे उभ्या राहत आहेत.गुरुवारी दुपारी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर रेल्वे उभ्या असल्यामुळे तपोवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आणण्यात आली; परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर बोगी कुठे उभी असेल हे दर्शविणाऱ्या डिस्प्लेची सुविधा नसल्यामुळे बोगी शोधण्यात प्रवाशांची एकच धावपळ झाली.प्लॅटफॉर्म एकवरील दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्रासही सहन करावा लागत आहे. या कामामुळे तपोवन, सचखंड, देवगिरी, नंदीग्रामसह बहुतांश रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवर उभ्या केल्या जात आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस आणण्यात आली; परंतु या प्लॅटफॉर्मवरील असुविधांमुळे प्रवाशांना त्रास झाला.उन्हात उभे राहण्याची वेळप्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या अगदी थोड्याशा भागावर शेड आहे. त्यामुळे रेल्वेची वाट बघत प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागले. कडक ऊन आणि बोगी शोधण्यासाठी झालेली धावपळ यामुळे प्रवासी बोगीमध्ये बसेपर्यंत घामाघूम झाले होते. या प्लॅटफॉर्मवरील अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव यामुळेही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.काम लवकर करण्याची मागणीरेल्वेस्थानकावरील रेल्वेंची संख्या पाहता प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील असुविधा दूर करण्याची गरज आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.डिस्प्लेअभावी धावपळप्लॅटफॉर्म क्रमांक चारवर बोगी क्रमांक दर्शविणारा डिस्प्ले नसल्यामुळे प्रवाशांची मोठीच धावपळ झाली. तपोवन एक्स्प्रेस येण्याआधीच बोगी कोठे उभी राहील याचा अंदाज प्रवासी लावत होते. गाडी आल्यानंतर अंदाज चुकल्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्मच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे धावपळ करून बोगी शोधावी लागली. ज्येष्ठ आणि लहान मुले सोबत असलेल्या प्रवाशांना मोठा त्रास झाला.
बोगी शोधण्यात प्रवाशांची धावपळ
By admin | Published: June 13, 2014 12:55 AM