लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण बँकेचे अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवारी सिडकोतील ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शनेही करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर १५ दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.ग्रामीण, बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करावी,भविष्य निर्वाह निधीची कपात करताना कोणतीही मर्यादा असू नये, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्य कार्यालयासमोर टाकलेल्या मंडपात सर्वजण दिवसभर बसून होते.कर्मचारी संघटनेचे सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, सर्व अधिकारी व कर्मचारी यांना संगणक वेतनवाढ व एफपीपी देण्यात यावे, अनुकंपा धर्तीवरील भरती पुन्हा चालू करावी, राष्ट्रीय ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात यावी, पुरस्कृत बँकेप्रमाणे सर्व भत्ते व सवलती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात याव्यात, बढती व भरती प्रक्रिया पुरस्कृत बँकेप्रमाणेच लागू कराव्यात, रोजंदारीवरील संदेशवाहकांना बँकेच्या सेवेत कायम करावे. मित्रा कमिटी व बदली धोरण बरखास्त करण्यात यावे व सर्व ग्रामीण बँकांना १० व्या वेतन कराराची समान अंमलबजावणी करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे....तर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णयअधिकारी संघटनेचे किशोर सावरगावकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने लीज डीड अॅग्रिमेंटमध्ये समानता ठेवावी, तसेच कोणतीही सवलत किंवा भत्ता देत असताना त्यामध्ये समानता असावी, ही सुद्धा आमची मागणी आहे; पण व्यवस्थापन याविषयी सकारात्मक दृष्टिकोनातून बघताना दिसून येत नाही. यामुळे धरणे आंदोलन करावे लागले. येत्या १५ दिवसांच्या काळात मागण्यांवर सकारात्मक विचार झाला नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. यावेळी सुरेश दासरवाड, महेश मगर, दिलीप कड, मुकुंद वसेकर यांच्यासह सर्व कर्मचारी, अधिकारी हजर होते.
औरंगाबादेत ग्रामीण बँक कर्मचारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:33 PM
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण बँकेचे अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवारी सिडकोतील ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार निदर्शनेही करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर १५ दिवसांनंतर पुन्हा आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ठळक मुद्देआंदोलन : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार निदर्शने; अनुकंपाची भरती पुन्हा चालू करा