व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णांना औषधे देणारे औषध निर्माण अधिकारी नाहीत. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. अशा बिकट स्थितीत पं. दीनदयाळ उपाध्याय स्वास्थ अभियानाच्या यशस्वीतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यात एकूण आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा रुग्णालयात मिळणारी आरोग्यसेवा तात्काळ ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयांची स्थापना झालेली आहे. जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, चिंचवण, धारूर, माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयांचा कारभार वैद्यकीय अधिक्षकाविनाच सुरू आहे. काही ठिकाणी प्रभारींवर मदार आहे.
वैद्यकीय अधीक्षकांविनाच चालतात ग्रामीण रुग्णालये
By admin | Published: May 07, 2017 12:02 AM