वाळूज महानगर : माजी सरपंच सचिन कल्याणराव पा. गरड यांची सरपंच सेवा महासंघाच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक पुरुषोत्तम घोगरे, राहुल उके यांच्या हस्ते नुकतेच सचिन गरड यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
फोटो क्रमांक- सचिन गरड
------------------------------
वाळूज येथून दुचाकी लंपास
वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन विठ्ठल निकाळजे यांनी शुक्रवारी वाळूजच्या श्रद्धा कॉलनीत दुचाकी (एम.एच.२०, बी.एच.०९५२) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
----------------------------
म्हाडा कॉलनीत पथदिवे बंद
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी ते आदर्श कॉलनी या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. या परिसरात बहुतांश कामगार वर्ग वास्तव्यास असून रात्री कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर कामगारांना अंधारातच चाचपडत ये-जा करावी लागत आहे. या भागातील पथदिवे सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांतून होत आहे.
--------------------
एनआरबी चौकात फळ विक्रेत्यांचे बस्तान
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एनआरबी चौकात रस्त्याच्या कडेला फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. या चौकात हातगाड्या तसेच छोटी वाहने रस्त्यावर उभी करून फळांची विक्री करतात. खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
------------------------